शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षीय बालिकेचे अपहरण

By admin | Updated: June 24, 2016 23:29 IST

आकोट येथे चॉकलेटचे आमिष देऊन पाच वर्षीय बालिकेचे अपहरण झाल्याची घटना.

आकोट (जि. अकोला): स्थानिक जिजामाता चौकानजीक असलेल्या सितला माता मंदिरापासून चॉकलेटचे आमिष देऊन पाच वर्षीय मनुश्री नामक बालिकेचे अपहरण केल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ११.३0 वाजता सुमारास घडली. सदर बालिकेचे अपहरण एका अज्ञात महिलेने केल्याचे प्रत्यक्षदश्रींनी पोलिसांना सांगितले. महिलेच्या वर्णनावरून पोलिसांनी नाकेबंदी करून शोधाशोध केली आहे.जिजामाता नगरातील संतोष श्यामराव लाकडे सेंट्रिंगचे काम करतात. त्यांची साडेपाच वर्षांची मनुश्री नामक मुलगी सकाळी शितला माता मंदिराजवळ सवंगड्यांसह खेळत होती. या ठिकाणी एका अज्ञात महिला आली. तिने मनुश्रीला जवळ घेत खाऊ दिला. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या दुसर्‍या मुलाला मोबाइल रिचार्ज आणण्याकरिता पाठविले आणि मनुश्रीला घेऊन त्या अज्ञात महिलेने पोबारा केला. घटनास्थळावर मनुश्री दिसत नसल्याने तिचे आई-वडील व परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती देत सर्वत्र शोधाशोध सुरू केली. यावेळी मनुश्री सोबत असलेल्या मुलाने सदर महिला ही सावळ्या रंगाची असून पोपटी, गुलाबी रंगाची डिझाइनची साडी नेसली असल्याचे वर्णन पोलिसांना सांगितले. या वर्णनावरून पोलिसांनी मनुश्रीचा फोटो सोबत घेऊन रेल्वे स्टेशन, झरी गेट, परतवाडा मार्गासह विविध मार्गांवर नाकेबंदी करून शोध घेतला. मनुश्रीचे अपहरण झाल्याच्या घटनेची माहिती होताच सर्वत्र सोशल मीडियावर तिचा फोटो व माहिती अपलोड करण्यात आली आहे.