शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ५ हजार घरांची लॉटरी!

By admin | Updated: December 21, 2015 02:31 IST

मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेली म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी आगामी मे महिन्यामध्ये काढण्याच्या हालचाली अधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत.

मुंबई : मुंबईकरांचे लक्ष लागून राहिलेली म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी आगामी मे महिन्यामध्ये काढण्याच्या हालचाली अधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. या लॉटरीमध्ये मुंबईतील सुमारे १ हजार ८४ घरांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, पुढील महिन्यात या लॉटरीची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळासह कोकण मंडळाच्या ४ हजार घरांचीही लॉटरी मे महिन्यात काढण्याचा विचार सुरू आहे. दोन्ही लॉटरी एकत्रित काढल्यास या लॉटरीत मुंबईकरांसाठी ५ हजार घरे उपलब्ध होतील.दरवर्षीप्रमाणे यंदाही म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाकडे अधिक घरे नसल्याने मंडळाची लॉटरी मे महिन्यात काढण्यात येणार आहे. या लॉटरीमध्ये १ हजार ८७ घरांचा समावेश आहे. प्रतीक्षानगर, मालाड आदी ठिकाणच्या घरांचा यामध्ये समावेश असेल. मंडळामार्फत घरांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम संपल्यानंतर पुढील महिन्यात अधिकृतरीत्या लॉटरीची घोषणा करण्यात येणार येईल, असे म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले. जानेवारी महिन्यात कोकण मंडळाची जाहिरात काढण्याची घोषणा म्हाडाने केली आहे. त्यानुसार कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लॉटरीची तयारी सुरू केली आहे. परंतु अद्याप लॉटरीचे काम पूर्ण झालेले नाही. विरार बोळींज येथील सर्वाधिक म्हणजे सुमारे 3500घरांचा जानेवारीच्या लॉटरीत समावेश करण्यात येणार आहे; तर मीरा रोड येथील २८0 आणि ठाणे येथील काही घरांचाही समावेश असणार आहे. एकत्रित लॉटरी झाल्यास एकाच वेळी दोन्हीसाठी अर्ज करता येणार असल्याने अर्जदारांचीही सोय होणार आहे.घरांच्या किमतींना प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली नसल्याने ही लॉटरी मे महिन्यात काढण्याचा विचारही कोकण मंडळातील अधिकारी करीत आहेत. या लॉटरीमध्ये विरार बोळींज, मीरा रोड आणि ठाणे येथील सुमारे ४ हजार घरांचा समावेश आहे.