शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

5 रुपयांत पोट भरतं; छे..

By admin | Updated: July 5, 2014 23:16 IST

पाच रुपयांत पोट कसे काय भरेल. आणि ज्यांना हे शक्य वाटते; त्यांनी तशी जबाबदारी घेत पाच रुपयांत लोकांचे पोट भरून दाखवावे; अशा तिखिट प्रतिक्रिया मुंबईकरांनी ‘लोकमत’ला दिल्या आहेत.

 

मुंबई : ज्या मुंबापुरीत 1क् रुपयांना वडापाव आणि 7 रुपयांना कटींग मिळते; तेथे पाच रुपयांत पोट कसे काय भरेल. आणि ज्यांना हे शक्य वाटते; त्यांनी तशी जबाबदारी घेत पाच रुपयांत लोकांचे पोट भरून दाखवावे; अशा तिखिट प्रतिक्रिया मुंबईकरांनी  ‘लोकमत’ला दिल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ‘मुंबईत 5 रुपयांत पोट भरतं’ असे विधान केले आणि एकच वादळ उठले. या विधानावर मुंबईकरांशी संवाद साधला असता त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसची सत्ता असताना काँग्रेसचे नेते अशी विधाने करून सर्वसामान्यांना दुखवत होते. आता भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे भाजपाचे नेते अशी विधाने करत सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत; अशा संमिश्र प्रतिक्रिया यावर सर्वसामान्यांनी दिल्या आहेत.
मालाड येथील विनोद घोलप यांनी सांगितले की, आजघडीला मुंबईमध्ये साधा वडापावदेखील दहा रुपयांमध्ये मिळतो. मग पाच रुपयांमध्ये पोट कसे काय भरेल. शेलार यांना म्हणजेच ओघाने भाजपाला, असे वाटत असले तर त्यांनी पन्नास लोकांची जबाबदारी घ्यावी. आणि दररोज पाच रुपयांत एका व्यक्तीचे पोट भरून दाखवावे. मग समजेलच की पाच रुपयांत पोट भरते की नाही ते.
बोरीवली येथील विपुल शहा यांनी सांगितले की, जेव्हा काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी  ‘मुंबईत बारा रुपयांत पोटभर जेवण मिळते.’ असे वक्तव्य केले होते. तेव्हा भाजपाने आकाश पाताळ एक केले होते. आता मात्र भाजपाची सत्ता आल्यानंतर शेलार यांनी असे वक्तव्य करून सर्वसामान्य माणसाला दुखावले आहे. मुंबईसारख्या शहरात पाच रुपयांत पोट भरणो मुश्कील आहे. शिवाय भाजपाला हे शक्य असेल तर त्यांनी दररोज शंभरएक माणसांची जबाबदारी घ्यावी. आणि पाच रुपयांत एका माणसाचे पोट भरून दाखवावे.
डोंगरी येथील निलेश शेळके यांनी सांगितले की, पाच रुपयांत साधा वडापावही मिळत नाही. कटिंगसाठी सात रुपये लागतात. मग पाच रुपयांत पोट कसे काय भरणार? हातगाडी ओढणा:या माणसाला विचारा की पोट भरण्यासाठी खिशात किती पैसे लागतात. आणि त्यांना जर वाटत असेल की, पाच रुपयांत पोट भरते तर त्यांनी तसे करून दाखवावे. मंत्रलय अथवा तत्सम सरकारी कार्यालयांमधील उपहारगृहात मात्र कमी पैशांत जेवण उपलब्ध होते. परंतू तो भाग निराळा आहे. (प्रतिनिधी)
 
तशी जबाबदारी घ्यावी..
च्कुर्ला येथील कप्तान मलिक यांनी सांगितले की, वडापाव दहा रुपयांत मिळतो. मग पाच रुपयांत पोट कसे भरेल. शेलार यांना तसे वाटत असेल तर त्यांनी तशी जबाबदारी घ्यावी आणि पाच रुपयांत लोकांची पोटं भरून दाखवावीत.
च्घाटकोपर येथील शैलेश शेट्टी यांनी सांगितले की, महागाई एवढी वाढली आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. असे असताना पाच रुपयांत पोट कसे काय भरेल? आणि ज्यांना हे शक्य वाटते आणि त्यांनी ते करून दाखवावे.