शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींमध्ये ५ टक्के लोकवर्गणीची अट रद्द

By admin | Updated: May 6, 2016 02:10 IST

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तातडीने करता याव्यात यासाठी विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार शासनाने वाढविले आहेत. तात्पुरती पूरक नळ

मुंबई : दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना तातडीने करता याव्यात यासाठी विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार शासनाने वाढविले आहेत. तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना सुरु करावयाची असल्यास २० लाख रुपयांपर्यंतच्या योजनेस प्रशासकीय मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना तर ५० लाख रुपयांपर्यंत मंजुरीचे अधिकार आयुक्तांना असतील. याशिवाय टंचाई निवारणासाठी तातडीची पाणीपुरवठा योजना निर्माण करावयाची असल्यास क वर्ग नगरपंचायतींना असलेली ५ टक्के लोकवर्गणीची अटही रद्द करण्यात आली आहे. महापालिका आणि अ व ब वर्ग नगरपालिकांना लोकवर्गणी भरण्याबाबत सवलत दिली जाणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरु स्तीसाठी जिल्हाधिकारी यांना ३० लाखांपर्यंत तर विभागीय आयुक्तांना ५० लाखांपर्यंतचे अधिकार निश्चित करण्यात आले आहेत.धरणामध्ये अथवा तलावामध्ये चर खणण्याकरीता जिल्हाधिकाऱ्यांना ५ लाखापर्यंत तर विभागीय आयुक्तांना १० लाखांपर्यंत आर्थिक मर्यादेचे अधिकार निश्चित करण्यात आले आहेत. तसेच जुन्या विहिरीची दुरूस्ती, विहीरी खोल करणे, पुनरुज्जीवित करणे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना २ लाखांपर्यंत तर विभागीय आयुक्तांना ३ लाखांपर्यंत आर्थिक मर्यादेचे अधिकार निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी आवश्यक ती तात्पुरती उपाययोजना (हायड्रन्ट) करण्यासाठीचे ५ किंवा १० हजारांचे प्रस्तावही पूर्वी मान्यतेसाठी मंत्रालयात येत होते. पण आता असे हायड्रंट मंजुर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत तर विभागीय आयुक्तांना १ लाख रुपयांपर्यंत आर्थिक अधिकार असतील. नगरपंचायतींसाठी ५ टक्के लोकवर्गणीची अट रद्दगाव किंवा वाड्यांच्या एक किलोमीटर परिसरातील सार्वजनिक उद्भवातून दरडोई दरिदवशी २० लिटर्सपेक्षा कमी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता असेल तर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार पाण्याची टंचाई जाहीर करता येऊ शकेल, असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)धरण, तलावांमध्ये चर खणणारराज्यातील अडीच हजारांपेक्षा अधिक प्रकल्पांत केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ नव्या उपाययोजना कार्यान्वित करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. यात प्रामुख्याने धरणांत किंवा तलावांमध्ये चर खणण्याला परवानगी देण्यात आली आहे. अवघे २ टक्के पाणीसाठा शिल्लक असलेल्या मराठवाड्याला या उपाययोजनेमुळे थोडा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.