शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कार्यालयात ५ लाखांचा अपहार

By admin | Updated: June 24, 2016 23:33 IST

वीज देयकाच्या एटीपी मशीनमधून उडविले पैसे; युवतीसह दोघांविरुद्ध गुन्हा.

खामगाव: येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयातील वीज बिलाचा भरणा करणार्‍या एटीपी मशीनमधून युवतीसह दोघांनी संगनमत करून परस्पर ५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी २४ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.नागपूर येथील अँड टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीकडून वीज बिलाचा भरणा करणारी एटीपी मशीन येथील मुख्य कार्यालयात लावण्यात आली आहे. मशीन हाताळण्यासाठी कंपनीकडून रूपाली मुळे रा. पिंपळगाव राजा व प्रवीण गजानन इंगळे रा.वाडी या दोघांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली होती. सदर एटीपी मशीनमध्ये जमा होणारी वीज बिलाची रक्कम दररोज महावितरणच्या एसबीआय बँकेच्या खात्यामध्ये जमा केली जाते; परंतु ९ जून रोजीची सुमारे ५ लाख ९१ हजार १५२ रुपये रूपाली मुळे आणि प्रवीण इंगळे यांनी बँकेत न भरता परस्पर अपहार केला. नागपूर येथील कंपनीचे सिनिअर इंजिनिअर एटीपी मशीनची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांना ९ जून रोजीची ५ लाख ९१ हजार १५२ रुपये ही रक्कम बँकेत जमा न झाल्याचे लक्षात आले. यावरून त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध पैशाचा अपहार केल्याबाबत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम ४0९, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.