शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षणगृहातून ५ मुलींचे पलायन

By admin | Updated: July 27, 2015 01:03 IST

येथील निरीक्षणगृहातून पाच अल्पवयीन मुलींनी रविवारी पहाटे अडीच वाजता पलायन केले. सकाळी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला

अहमदनगर : येथील निरीक्षणगृहातून पाच अल्पवयीन मुलींनी रविवारी पहाटे अडीच वाजता पलायन केले. सकाळी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला. तीन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे प्रशासन अडचणीत आले आहे. कोतवाली पोलिसांची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. येथील अमरधाम रोडवरील निरीक्षणगृहात अल्पवयीन गुन्हेगार, अनाथ व पालकांनी नाकारलेली मुले ठेवली जातात. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून आणणे, मुलींचे अपहरण करणे अशा गुन्ह्यातील ज्या पीडित मुलींना पालकांनी नाकारले, त्यांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. रविवारी पहाटे अडीच वाजता निरीक्षणगृहाच्या काळजीवाहक रेखा घनश्याम वर्मा झोपलेल्या असताना त्यांची नजर चुकवून त्यातील पाच मुलींनी पलायन केले. त्यांच्या रूममध्ये असलेली प्रवेशद्वाराची चावी घेऊन मुलींनी पळ काढला. सकाळी ६च्या दरम्यान वर्मा यांनी चावी शोधली असता, त्यांना सापडली नाही तसेच प्रवेशद्वारही उघडे दिसले. त्यानंतर चौकशी केली असता पाच मुली पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. निरीक्षणगृहाच्या व्यवस्थापिका सुमन शिवाजी जाधव यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. संबंधित पाच मुली नगर जिल्ह्यातीलच आहेत. अपहरण, लग्नाची फूस लावून पळवून नेण्याच्या प्रकरणातील त्या फिर्यादी आहेत. त्यांना पालकांनी नाकारल्याने निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते, असे पोलीस निरीक्षक मालकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)