शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

५९ अभियांत्रिकी महाविद्यालये संकटात

By admin | Updated: July 7, 2014 03:47 IST

अल्पसंख्याकांचे हित जोपासण्यास शासनाने खास अल्पसंख्याक विकास विभाग स्थापन केला. पण प्रत्यक्षात हा विभागच अल्पसंख्याकांच्या हिताला सुरुंग लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

मुंबई : अल्पसंख्याकांचे हित जोपासण्यास शासनाने खास अल्पसंख्याक विकास विभाग स्थापन केला. पण प्रत्यक्षात हा विभागच अल्पसंख्याकांच्या हिताला सुरुंग लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या विभागाच्या एका चुकीच्या आदेशाने राज्यभरातील अल्पसंख्याकांची अभियांत्रिकी महाविद्यालये संकटात सापडली आहे. राज्यात ३८७ अभियांत्रिकी महाविद्यालये असून तेथील विद्यार्थी क्षमता एक लाख ६२ हजार आहे. परंतु प्रत्यक्षात यावर्षी अभियांत्रिकी प्रवेशासाठी एक लाख सहा हजार एवढेच विद्यार्थी पात्र ठरतात. त्यामुळे सध्याच राज्यात अभियांत्रिकीच्या किमान ५६ हजार जागा रिक्त राहण्याची चिन्हे आहेत. त्यातच शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने १८ जून २०१४ रोजी जारी केलेल्या एका उफराट्या आदेशाने राज्यातील अल्पसंख्याकांच्या संस्थांची ५९ अभियांत्रिकी महाविद्यालये अडचणीत आली आहे. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक संस्थांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या ५१ टक्के जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव असतात. उर्वरित ४९ टक्के जागांपैकी २० टक्के जागा व्यवस्थापन कोट्यासाठी तर २९ टक्के जागांचे प्रवेश हे ‘कॅप’मधून (केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया) होतात. कॅपमधील सर्व जागांना शासन शिष्यवृत्ती देते. तर अल्पसंख्याक कोट्यातील जागांना ही शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा या कोट्यातील जागांकडे कल नसतो. कारण त्यांना पूर्ण शैक्षणिक शुल्काचा बोजा सहन करावा लागतो. ‘कॅप’मधून प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी या कोट्यातील प्रवेशाकडे पाठ फिरवितात. त्यामुळे अभियांत्रिकी प्रवेशाच्या फेऱ्या सुरू होण्यापूर्वी अल्पसंख्याक महाविद्यालये आपल्या कोट्यातील जागा शासनाला ‘कॅप’ प्रवेशासाठी सुपुर्द (सरेंडर) करतात. परंतु यावर्षी अल्पसंख्याक विभागाने या प्रवेशासंबंधी अडचण निर्माण करणारा आदेश जारी केला. त्यात व्यवस्थापन कोट्याच्या जागा सरेंडर करण्याची लांबलचक प्रक्रिया सूचविली आहे. त्यामुळे कदाचित जागा सरेंडर करण्याची परवानगी मिळण्यापूर्वीच कॅप प्रवेशाचे सर्व फेऱ्या पूर्ण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसे झाल्यास अभियांत्रिकीतील अल्पसंख्याकांसाठी राखीव जागाच भरल्या जाणार नाही. कारण हे प्रवेश शिष्यवृत्तीविना असल्याने कुणीही विद्यार्थी याकडे फिरकणार नाहीत. त्यामुळेच ही महाविद्यालये संकटात सापडली आहेत. (प्रतिनिधी)