शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

४८२ संकेतस्थळे ब्लॉक करा

By admin | Updated: July 7, 2016 00:10 IST

बालाजी मोशन पिक्चर्स लि. चा ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच इंटरनेटवर उपलब्ध झाल्याने उच्च न्यायालयाने संबंधित ४८२ संकेतस्थळे ब्लॉक करण्याचा आदेश सायबर सेलला

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्स लि. चा ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच इंटरनेटवर उपलब्ध झाल्याने उच्च न्यायालयाने संबंधित ४८२ संकेतस्थळे ब्लॉक करण्याचा आदेश सायबर सेलला दिला. तसेच डीटीएच आॅपरेटर्स व केबलधारकांनाही हा चित्रपट दाखवण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.सुमारे ८०० संकेतस्थळांकडे चित्रपटाची कॉपी आहे. त्या सर्व संकेतस्थळांमुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच उपलब्ध झाला आहे, असे ‘बालाजी’तर्फे ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाला सांगितले. यासंदर्भात मुंबईच्या सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून बहुतांश टिष्ट्वटर हॅण्डलर्सनी टोरन्ट लिंकवरून तो डाऊनलोड केल्याचे मान्य केले आहे, असेही धोंड यांनी न्या. पटेल यांना सांगितले.त्यावर खंडपीठाने संबंधित संकेतस्थळांचीच नावे द्या, असे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले. ज्या संकेतस्थळांनी चित्रपट उपलब्ध केला किंवा ज्यांच्यावर तुमचा संशय आहे, अशाच संकेतस्थळांची नावे द्या. सरसकट आदेश दिला तर काही संकेतस्थळांवर याचा परिणाम होईल, असे न्या.पटेल यांनी सांगितले.‘लीक’ करणाऱ्या साइट्सचा अभ्यास करण्यासाठी खासगी सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीने ४८२ संकेतस्थळे जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तसेच गुगललाही या लिंक बंद करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती अ‍ॅड. धोंड यांनी न्यायालयाला दिली.धोंड यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. पटेल यांनी मुंबई सायबर सेलला संबंधित ४८२ संकेतस्थळ ४ आॅक्टोबरपर्यंत ब्लॉक करण्याचा आदेश दिला. तसेच न्यायालयाने सर्व केबलधारकांना व डीटीएच आॅपरेटर्सना निर्मात्याच्या संमतीशिवाय चित्रपट दाखवू नका, असे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)