शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅप्सद्वारे ४८ हजार ९६७ वीजग्राहकांना जोडणी

By admin | Updated: April 3, 2017 03:11 IST

अ‍ॅप्सला वीजग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत अ‍ॅप्सद्वारे ४८ हजार ९६७ नव्या ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली

मुंबई : महावितरणचा कारभार पारदर्शी होण्यासह वीजग्राहकांना कमीत कमी वेळेत वीजजोडणी उपलब्ध व्हावी आणि गाऱ्हाणे मांडता यावे, यासाठी महावितरणने कार्यान्वित केलेल्या अ‍ॅप्सला वीजग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत अ‍ॅप्सद्वारे ४८ हजार ९६७ नव्या ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे.राज्यभरातील वीजग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ‘मोबाइल अ‍ॅप’ला वीजग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अ‍ॅप कार्यान्वित झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत सुमारे ३ लाखांहून अधिक ग्राहकांनी हे ‘मोबाइल अ‍ॅप’ डाउनलोड केले होते, शिवाय नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३२ ग्राहकांना मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण करून केवळ २४ तासांमध्ये वीजजोडणी देण्यात आली होती. राज्यात इतर ठिकाणी अशाच प्रकारे वीजजोडणी देण्यात येत आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत आमदार नीलम गोऱ्हे यांनी महावितरणच्या अ‍ॅप्सवर कौतुकाचा वर्षावर करत, मोबाइल अ‍ॅप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर आणि आॅनलाइन सेवा मिळत असल्याचे नमूद केले, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)विविध सेवा आॅनलाइन, विशेषत: मोबाइलवर उपलब्ध व्हाव्यात, म्हणून महावितरणने वीजग्राहकांना ‘मोबाइल अ‍ॅप’ची सुविधा दिली आहे. यात विविध पर्यायाद्वारे, वीजबिलाचे रीडिंग न घेतल्यास, ग्राहकाला स्वत: फोटोद्वारे आपल्या वीजबिलाचे रीडिंग पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. शिवाय नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची, तसेच वीजबिलांचा भरणा, वीजसेवांबाबत तक्रारी इत्यादी महत्त्वाच्या सुविधाही देण्यात आलेल्या आहेत.