शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

४,५०० डॉक्टर संपावर, राज्यभर रुग्णांचे हाल

By admin | Updated: March 21, 2017 06:24 IST

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ले सुरूच असून गेल्या आठ दिवसात चार ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसल्याने

मुंबई : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ले सुरूच असून गेल्या आठ दिवसात चार ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसल्याने सोमवारी राज्यातील रुग्णसेवा विस्कळीत झाली. सुमारे ४ हजार ५०० निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले होते. दरम्यान, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये ११०० सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये दिली. तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला.राज्यात रुग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांवर हल्ले सुरूच आहेत. धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. रोहन महामुणकर यांच्यावर १२ मार्च रोजी रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला झाला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात १७ मार्च रोजी अधिपरिचारिका चारुशिला इंगळे व वैद्यकीय अधिकारी राहुल नामदेव पाटील यांना मारहाण करण्यात आली. १८ मार्च रोजी मुंबईतील सायन रुग्णालयात डॉ. रोहित कुमार यांच्यावर हल्ला झाला. तर रविवारी रात्री औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात डॉ. उमेश काकडे आणि डॉ. विवेक बडगे यांना मारहाण झाली. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे निवासी डॉक्टरांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांत जवळपास ५० निवासी डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे राज्यभरातील निवासी डॉक्टर्स सोमवारी सामूहिक रजेवर गेले. नागपूरच्या मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ५० टक्के शस्त्रक्रिया रखडल्या. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयातील रुग्णसेवा संपामुळे कोलमडून गेली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित दामले, यांच्यासमवेत निवासी डॉक्टरांची बैठक झाली. सुरक्षा यंत्रणा सक्षम होत नाही, तोपर्यंत कामावर न येण्याचा निर्धार डॉक्टरांनी बोलून दाखविला. (प्रतिनिधी)रुग्ण व नातेवाईकांसाठी ‘प्रवेश पास’ -रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांना एक 'प्रवेश पास' व रुग्णाच्या नातेवाईकांसाठी दोन 'प्रवेश पास' देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश मुंबई पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सोमवारी दिले. ज्या व्यक्ती विना पास रुग्णालयात आढळून येतील त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही मेहता यांनी सांगितले.जर निवासी डॉक्टरांनी काम सुरू केले नाही, तर नियमानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी डॉक्टरांच्या बैठकीत दिला. डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईतील केईएममधील १२६ शस्त्रक्रिया, शीव १०२ आणि जे. जे. रुग्णालयातील २२ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. सोमवारी रुग्णालयांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरूहोती.‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे सदस्य मंगळवारी निवासी डॉक्टरांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी आणि निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा करण्यात येईल.- डॉ.सागर मुंदडा, इंडियन मेडिकल असोसिएशन, युथ विंग अध्यक्षराज्यभरात सामूहिक रजेवर गेलेल्या निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात ‘मार्ड’चा संघटना म्हणून सहभाग नाही. असुरक्षिततेच्या भावनेमुळे राज्यभरातील निवासी डॉक्टर वैयक्तिक पातळीवर सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे संघटना केवळ कायदेशीरपद्धतीने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आंदोलन कधीपर्यंत सुरू राहील हे आम्ही सांगू शकत नाही.- डॉ. स्वप्निल मेश्राम, सचिव, ‘मार्ड’.