शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दोन महिन्यांत ४४१ बालमृत्यू

By admin | Updated: July 16, 2016 01:15 IST

आरोग्याच्या असंख्य योजना आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद असतानाही राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण मात्र खूप मोठे असल्याचे राज्य कुटुंबकल्याणकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले

पुणे : आरोग्याच्या असंख्य योजना आणि कोट्यवधी रुपयांची तरतूद असतानाही राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण मात्र खूप मोठे असल्याचे राज्य कुटुंबकल्याणकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ही संख्या थोडीथोडकी नसून दोन महिन्यांत राज्यात विविध कारणांनी ४४१ बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आदिवासी भागातील जनतेच्या आरोग्यात सुधारणा करण्याच्या हेतूने राज्यभरात नवसंजीवनी योजना राबविण्यात येते. यामध्ये आदिवासी जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरविणे, पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, अन्नधान्यपुरवठा निश्चित करून योग्य आहार देणे, कुपोषित बालकांवर वेळीच योग्य ते उपचार करणे अशा प्रकारच्या सुविधा राज्य शासनाकडून पुरविल्या जातात. गरोदर माता व अर्भकमृत्यू कमी करणे हा या योजनेमागील मूळ उद्देश असून तो साध्य होत नसल्याचेच उघडपणे समोर येत आहे. यामध्येही ० ते १ वर्षे वयोगटातील ३५० बालकांचा, तर १ ते ६ वर्षे वयोगटातील ९१ बालकांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार येथे सवार्धिक म्हणजे एप्रिल व मे या केवळ दोन महिन्यांत ८४ बालके मृत्युमुखी पडली असून सर्वात कमी म्हणजे ३ बालमृत्यू हे जळगाव येथे झाले आहेत. महाराष्ट्र राज्याचा बालमृत्यूदर दर हजारी जन्मदरामागे २४ इतका असून इतर राज्यांच्या तुलनेत हा कमी असल्याचे कुटुंब कल्याण विभागाकडून सांगण्यात आले. मात्र मागील जवळपास २० वर्षांपासून चालविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत एकूण १६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येते. यामध्ये १०३ ग्रामीण रुग्णालये, ४११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २३२२ उपकेंद्रे व १३६८१ अंगणवाड्यांमध्ये योजनेमधील विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.