शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४४ सिकलसेलचे रुग्ण उपचारापासून वंचित

By admin | Updated: August 5, 2014 01:03 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या राज्य प्रमुखाने सार्वजनिक आरोग्य मंत्रालयास सिकलसेलग्रस्तांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांचे निवारण करण्याचे प्रावधान असल्याचे स्पष्ट केले आहे.

राजीव गांधी जीवनदायी योजना : ‘हिप जॉर्इंट’ बदलण्यास नकारनागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या राज्य प्रमुखाने सार्वजनिक आरोग्य मंत्रालयास सिकलसेलग्रस्तांच्या सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांचे निवारण करण्याचे प्रावधान असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु या योजनेत पात्र असलेल्या तब्बल ४४ सिकलसेलग्रस्तांचे हिप जॉर्इंट बदलविण्यास इस्पितळांनी चक्क नकार दिला आहे. या आजाराचा योजनेत समावेशच नसल्याचे इस्पितळांचे म्हणणे आहे, परिणामी यासारखे अनेक रुग्ण अडचणीत आले आहेत.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला २ जानेवारी २०१२ रोजी पत्र दिले. यात ८५७, ७६७ ते ७७० व ७८० ते ७९९ अन्वये सिकलसेलग्रस्तांच्या सर्व प्रकारच्या आराग्ेय समस्यांचे निवारण करण्याचे प्रावधान असल्याची माहिती दिली. परंतु या योजनेत पात्र असलेले सिकलसेलचे रुग्ण ज्यांचे हिप जॉर्इंट पूर्णपणे बदलण्याची गरज आहे, त्यांना संबंधित इस्पितळाने उपचारास नकार दिला. योजनेत हा आजारच नसल्याचे सांगितले. या संदर्भात सिकलसेल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संपत रामटेके यांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, योजनेचे राज्य प्रमुख, अभियान संचालक व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान प्रमुखास १६ मार्च २०१४ रोजी पत्र लिहून रुग्णांवरील अन्यायाबाबत पुनर्विचार करावा, अशी विनंती केली. यासोबतच महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील ४४ सिकलसेलग्रस्त रुग्णांचे ‘हिप जॉर्इंट’ बदलविण्याची यादीसुद्धा सादर केली. धक्कादायक म्हणजे, या पत्रावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त व संचालकांनी असे उत्तर दिले की, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत येत असलेल्या ९७२ मधील अनु क्रमांक ७६७ ते ७७० मध्ये हिप जॉर्इंटवर शस्त्रक्रिया करणे शक्य असलेतरी अद्याप काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य नाही. यामुळे सिकलसेलग्रस्तांसाठी जीवनदायी आरोग्य योजना मरणदायी ठरू पाहत आहे. (प्रतिनिधी)