शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून ४२ हजार टन द्राक्षांची निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 19:30 IST

भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली असून सध्या द्राक्ष हंगाम बहरात असून निर्यातक्षम द्राक्षाची मागणी युरोप

ऑनलाइन लोकमत

निफाड (नाशिक), दि. 02 - भारतातून या वर्षी आतापर्यंत ४२ हजार १०४ टन द्राक्षांची निर्यात झाली असून सध्या  द्राक्ष  हंगाम बहरात असून निर्यातक्षम द्राक्षाची मागणी युरोप, रशिया आदी ठिकाणी असल्याने यावर्षी  आतापर्यंत २३.७१ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली असली तरी निर्यातक्षम द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्षनिर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

यंदाच्या द्राक्ष हंगामात विशेषत: महाराष्ट्रातून निर्यात झालेल्या द्राक्षाला सुरुवातीला  १०० रूपयांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. आता मात्र चिली हा देशही सध्या द्राक्ष निर्यात करीत असल्याने पांढरे द्राक्ष ५० ते ६० रु पये व काळी द्राक्ष ६० ते ७० रूपये सरासरी भावाने निर्यात होत आहे. सुरुवातीला काही निर्यातदारांनी साखर कमी असूनही माल पाठवला. परिणामी तेथील मार्केटमध्ये अपप्रचार होऊन आणि शिवाय चिलीचा माल स्पर्धेत असल्याने अवघ्या ३० दिवसात भाव निम्म्याने खाली आले. युरोपमध्ये तरी भाव सरासरी टिकून आहे. रशियात ते ४० रूपयांपर्यंत खाली आले आहेत. असे असले तरी मार्च अखेरपर्यंत चिलीचा माल संपेल आणि तपमान असेच  वाढत गेले तर द्राक्षांना मागणी वाढून भारतीय द्राक्षाला दरही चांगला मिळेल फक्त कोणतेही नैसर्गिक संकट या काळात  यायला नको असा आशावाद अखिल   भारतीय  द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन खापरे यांनी व्यक्त केला. फक्त द्राक्ष उत्पादकांनी घाई न करता संयमाने घ्यावे ८ ते १० दिवसात मार्केटमध्ये पुन्हा तेजी येऊ शकेल.

मागील वर्षी युरोपमध्ये ८४ हजार मे टन निर्यात झाली होती. आताच्या घडीला ती ४२ हजार १०४ मे टन इतकी असून यंदाच्या हंगामात ती ९० हजार मे टन च्याही  पुढे जाईल असा अंदाज खापरे यांनी व्यक्त केला. साधारणत: युरोप बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक निर्यात रशिया मध्ये झाली आहे मात्र त्याची आकडेवारी उपलब्ध होत नसल्याचे ते म्हणाले.

नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीत तब्बल २५ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात जवळपास ५६ हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड झाली असल्याची नोंद आहे. गेल्या हंगामात एक लाख आठ हजार टन द्राक्षाची निर्यात झाली होती. त्यापैकी ७५ हजार टन द्राक्ष हे युरोपमध्ये आणि ३३ हजार टन द्राक्ष रशिया ,बांगलादेश,दुबई या देशात करण्यात आली आहे.