शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

४२ कृषिसेवा केंद्रांमध्ये आढळले संशयास्पद बियाणे!

By admin | Updated: June 9, 2016 02:38 IST

विक्री बंद करण्याचे आदेश; दक्षता पथकाची कारवाई.

गणेश मापारी / खामगाव (जि. बुलडाणा) कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी असलेल्या गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथकाने जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांमध्ये केलेल्या तपासणीत ४२ ठिकाणी विशिष्ट लॉट नंबरचे संशयास्पद बियाणे आढळले आहेत. त्यामुळे संबंधित बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश या कृषिसेवा केंद्रांना देण्यात आले आहेत.खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू होताच बी-बियाणे, रासायनिक खतांचा काळाबाजार करणर्‍यांचे टोळकेही सक्रिय होते. प्रमाणित व नामांकित बियाण्याच्या नावावर बनावट बियाणे आणि रासायनिक खतांची शेतकर्‍यांना विक्र ी केली जाते. त्यामुळे बियाणे-खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर एक आणि जिल्हास्तरावर एक गुणवत्ता नियंत्रण पथक नेमण्यात येते. बुलडाणा जिल्ह्यात तालुकास्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे १३ आणि जिल्हास्तरावर एक अशी एकूण १४ दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी केलेल्या तपासणीत ४२ कृषिसेवा केंद्रांमध्ये विशिष्ट लॉट नंबरचे संशयास्पद बियाणे आढळून आले आहेत. त्यामुळे त्या कृषिसेवा केंद्रांना संबंधित बियाण्याची विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.असे आहे दक्षता पथकतालुकास्तरीय पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी पथकप्रमुख आहेत, तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी, वजनमापे निरीक्षक, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय पथकामध्ये पथकप्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी, तर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, सहायक नियंत्रक वैध मापनशास्त्र आणि जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी हे सदस्य आहेत.कारवाई झालेले कृषीसेवा केंद्रतालुका          कृषिसेवा केंद्रेबुलडाणा         0१चिखली          १0देऊळगावराजा  0४खामगाव         0४शेगाव            0५संग्रामपूर        १0नांदुरा            0१मलकापूर       0७एकू ण           ४२