शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमधील शेंद्री- सुनेगावात मतदानावर बहिष्कार, जिल्ह्यात दुपारपर्यंत 42 टक्के मतदान

By admin | Updated: February 16, 2017 17:02 IST

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३७.४७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी मतदानात पुन्हा वाढ होऊन ४२ टक्क्यांपर्यंत

लातूर : लातूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३७.४७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी मतदानात पुन्हा वाढ होऊन ४२ टक्क्यांपर्यंत मतदान केले. ५.३० वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, अहमदपूर तालुक्यातील शेंद्री- सुनेगावात मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला असून, त्यांची रस्त्याची मागणी आहे.जिल्हा परिषदेच्या ५८ आणि पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी हे मतदान होत असून, लातूर तालुक्यात ३४.४४, रेणापूर तालुक्यात ४१.०३, औसा तालुक्यात ३८.९९, उदगीर तालुक्यात ४३.१२, अहमदपूर तालुक्यात ३७.०८, चाकूर तालुक्यात ३८.३४, जळकोट तालुक्यात ३४.३०, निलंगा तालुक्यात ४०.५०, देवणी तालुक्यात ३८.२८, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३९.९० टक्के असे मतदान दुपारी १.३० वाजेपर्यंत झाले होते. त्यानंतर मतदानात वाढ होत दुपारी ४.१५ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान झाले होते. शेंद्री-सुनेगावात मतदानावर बहिष्कार...अहमदपूर तालुक्यातील शेंद्री-सुनेगावला रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी दुपारी ३.४० वाजेपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी गावास भेट देऊन गावकऱ्यांची समजूत घातली. मात्र गावकरी आपल्याच भूमिकेवर ठाम आहेत.