इस्लामपूर/ मुंबई : औद्योगिक वसाहतीतील ओंकार इंडस्ट्रीजच्या गोदामावर केंद्र शासनाच्या अमली पदार्थविरोधी महसूल संचालनालयाच्या पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून सुमारे २० कोटी रुपये किमतीचा ३४० किलो मेफेड्रॉन हा अमली पदार्थ हस्तगत केला. दोघांना पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.दुसऱ्या एका घटनेत मुंबईत पोलीस हवालदार असलेल्या धर्मराज बाहुराव काळोखे (५२) याच्या खंडाळा तालुक्यातील कण्हेरी गावातील घराची झडती घेतल्यानंतर सुमारे २२ कोटी रुपये किमतीचा मेफेड्रॉन जप्त करण्यात आला़ हवालदार काळोखेला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कोंडूस्कर यांच्या गोदामावर छापा टाकून पथकाने तेथील अमली पदार्थ जप्त करून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर कंपनी कार्यालयासह गोदामाला सील ठोकले. मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कण्हेरी गावात काळोखे घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याने मुंबईहून आणलेल्या पाच बॅगा शेजाऱ्याकडे ठेवण्यास दिल्याचे स्पष्ट झाले.
पश्चिम महाराष्ट्रातून ४२ कोटींचे मेफेड्रॉन हस्तगत
By admin | Updated: March 11, 2015 02:36 IST