मुंबई : जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या साहित्याला गेली चार शतके वाचकांनी पहिली पसंती दिली आहे. शेक्सपिअर यांच्या नाट्यकृतींचा एकत्रित संग्रह असलेल्या ‘फर्स्ट फोलिओ’ पुस्तकाची मुद्रित प्रत मुंबईकरांना पाहण्याची संधी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.विल्यम शेक्सपिअर यांची इंग्रजी भाषेतील पुस्तके, नाटके अजरामर आहेत. रोमियो आणि ज्युलिएटच्या माध्यमातून त्यांनी प्रेमकथा मांडली. त्यामुळे रोमिओ-ज्युलिएट ही जोडी जगभर प्रसिद्ध झाली. शेक्सपिअर यांच्या लिखित साहित्यातील कोणत्याही पुस्तकाची मूळ प्रत आता उपलब्ध नाही. केवळ ‘फर्स्ट फोलिओ’ या पुस्तकाची मूळ प्रत उपलब्ध असून ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात २० जानेवारी ते ८ मार्च या कालावधीत ठेवण्यात येणार आहे. वस्तुसंग्रहालयात शेक्सपिअरचे स्वतंत्र दालन तयार करण्यात आले असून शेक्सपिअरच्या साहित्याचा समावेश त्यात करण्यात आला आहे. रोमियो आणि ज्युलिएट या नाटकांचा अनुभवही रसिकांना या दरम्यान होणाऱ्या प्रयोगातून घेता येणार आहे. (प्रतिनिधी)तुम्हाला हे माहिती आहे का ?शेक्सपिअरने सर्वात प्रथम द टू जंटलमेन आॅफ वेरोना हे नाटक लिहिले. फर्स्ट फोलिओमध्ये द टेम्प्टेस्ट, द मर्चंट आॅफ व्हेनिस, द लाइफ अॅण्ड डेथ आॅफ किंग जॉन, टष्ट्वेल्थ नाइट, द लाइफ अॅण्ड डेथ आॅफ ज्युलिअस सीझर या जगप्रसिद्ध नाटकांचा समावेश आहे.२३४ प्रतीच उपलब्धशेक्सपिअरचे फर्स्ट फोलिओ हे पुस्तक त्याच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाच्या ७५० प्रती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यातील २३४ प्रती अजूनही आहेत. यातील ५ प्रती ब्रिटिश कौन्सिलच्या वाचनालयात असल्याची माहिती कौन्सिलकडून देण्यात आहे. फर्स्ट फोलिओ हे पुस्तक अत्यंत महागडे पुस्तक असून २००१ साली न्यूयॉर्क येथे झालेल्या क्रिस्टी लिलावात त्याची किंमत सुमारे ६० लाख १६ हजार इतकी होती.
शेक्सपिअरचे ४०० वर्षे जुने ‘फर्स्ट फोलिओ’ पुस्तक मुंबईकरांच्या भेटीला
By admin | Updated: January 20, 2017 07:38 IST