शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा ४०० नवजातांचे मृत्यू

By admin | Updated: November 24, 2015 02:29 IST

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुंबई : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात दर महिन्याला सरासरी ४०० नवजात बालकांचे मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीवरून हे सत्य समोर आले आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने यंदा प्रसिद्ध केलेल्या अहवालात, २००८ ते २०१२ पर्यंतची आकडेवारी दिली आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत ३२ हजार ६६४ बालमृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. संसर्ग, न्यूमोनिया, अतिसार, तापाचे विकार आणि श्वसनविकारामुळे मुंबई शहरातील बालकांचे मृत्यू होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. नवजात शिशुंची योग्य ती निगा राखल्यास, ५० ते ६० टक्के अर्भकांचा मृत्यू टाळता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. देशात दररोज तीन हजार बालके कुपोषणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या संदर्भात जागृती करण्यासठी ‘नवजात बालक काळजी सप्ताह’ मुंबईतील रुग्णालयांमध्ये राबवण्यात आला. नवजात बाळाची काळजी जन्मापासून ते २८ दिवसांपर्यंत घ्यायची असते. या काळातली निगा ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण याच दिवसांत नवजात बालकांना जंतू संसर्गाची जास्त शक्यता असते. गर्भधारणा झाल्यापासून बालकाला जन्म देईपर्यंतचा काळ अतिशय काळजीचा असतो. त्याचसोबत व अधिक महत्त्वाचा काळ जन्मलेल्या नवजात बाळाच्या संगोपनाचा असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत विधीवत शिक्षण घेणे अमेरिकेसारख्या देशात सक्तीचे करण्यात आलेले आहे. आपल्याकडे मात्र जन्म देणाऱ्या मातेची ती जबाबदारी आहे, असेच मानले जाते. -डॉ. समीर शेख, नवजात अतिदक्षता विभाग प्रमुख व नवजात शिशुतज्ज्ञ, वोक्हार्ट रुग्णालय