शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

विकासकामांना ४० टक्के कट!

By admin | Updated: November 18, 2014 03:14 IST

राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, भीषण दुष्काळी परिस्थिती तोंडावर असताना विकासकामांसह इतर खर्चात किमान ४० टक्के कपात केल्याशिवाय पर्याय नाही

यदु जोशी, मुंबईराज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, भीषण दुष्काळी परिस्थिती तोंडावर असताना विकासकामांसह इतर खर्चात किमान ४० टक्के कपात केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत वित्त खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वीज दरातील सवलतींसह इतरही अनेक सवलतींना कात्री लागण्याची शक्यता आहे.वित्त खात्याचा कारभार हाती घेऊन सुधीर मुनगंटीवार यांना पंधरा दिवसही होत नाहीत तोच वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनासमोर राज्याचे भीषण आर्थिक वास्तव मांडले असून, विकासकामे आणि इतर खर्चात ४० टक्के कपातीचे सूतोवाच केले आहे. राज्याची तिजोरी व्हेंटिलेटरवर असल्याचे बघितल्यानंतर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारही चक्रावून गेले. अंदाजित खर्च आणि उत्पन्नाची आकडेवारी सादर करताना या दोन्ही बाबींचा मेळ साधणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत वित्त खात्याने दिले आहे. राज्यात पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपासमोर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान एकीकडे असताना दुसरीकडे त्यासाठी आवश्यक असलेला पैसा तिजोरीत नाही, अशी अवस्था आहे. २ लाख १ हजार ९४ कोटी रुपये खर्च आणि १ लाख ८० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अंदाजित आहे. अशा परिस्थितीत विकासाला कात्री लागणे आता अपरिहार्य मानले जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेली वीज दरातील वाढ कमी करून घरगुती (० ते ३०० युनिटपर्यंत) वाणिज्यिक, औद्योगिक व कृषी पंप ग्राहकांना दिलासा देण्यात आला होता. या सवलतीपोटी राज्य शासन महावितरणला दरमहा ७०६ कोटी इतके अर्थसाहाय्य देत आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत त्याची तरतूदही करण्यात आली आहे. या सवलतीचा फेरविचार करण्याची शिफारस आता वित्त विभागाने शासनाला केली आहे. त्यामुळे हे अनुदान बंद केले जाऊ शकते.