शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गरीब रुग्णांसाठी आता ४० टक्के बेड्स राखीव

By admin | Updated: January 7, 2017 02:07 IST

सरकारी-खासगी भागीदारीत नाममात्र भाडेपट्टीवर महापालिकेचे भूखंड घेऊन त्यावर प्रसूतिगृह बांधल्यानंतर खासगी रुग्णालय प्रशासन गरिबांना सेवा नाकारत आहेत

मुंबई : सरकारी-खासगी भागीदारीत नाममात्र भाडेपट्टीवर महापालिकेचे भूखंड घेऊन त्यावर प्रसूतिगृह बांधल्यानंतर खासगी रुग्णालय प्रशासन गरिबांना सेवा नाकारत आहेत. त्यांच्या या मनमानीला चाप लावण्यासाठी महापालिकेने धोरणातच बदल केला आहे. त्यामुळे गरीब रुग्णांसाठी २० ऐवजी ४० टक्के बेड्स राखून ठेवण्यात येणार आहेत. या धोरणाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.सध्याच्या धोरणानुसार सरकारी-खासगी तत्त्वावरील रुग्णालयात २० टक्के बेड्स गरीब रुग्णांसाठी राखीव असतात. मात्र प्रसूतिगृह व रुग्णालयांची तपासणी केली असता त्यामध्ये अनियमितता आढळून आली आहे. २००६ साली महापालिकेने २० खासगी संस्थांशी करार केला. त्यानुसार एक रुपया नाममात्र भाड्याने या संस्थांना प्रसूतिगृहांसाठी जागा देण्यात आल्या. मात्र २० पैकी १६ रुग्णालयांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू केले. यामध्ये गरीब रुग्णांना करारानुसार सुविधा नाकारण्यात येऊ लागल्या. ही बाब उघडकीस आल्यानंतर महापालिकेने जागा रिकामी करण्याची नोटीस संबंधित संस्थांना दिली. याचा चौकशी अहवाल तयार झाल्यानंतर धोरणात बदल करण्यात आला आहे. यामध्ये ४० टक्के बेड्स गरीब रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)४० पैकी ३० टक्के बेड्स महापालिकेच्या दरात प्रसूतीसाठी तर दहा टक्के बाल अतिदक्षता विभागासाठी तर उर्वरित ६० टक्के अन्य उपचारासाठी वापरण्याची परवानगी रुग्णालयास असणार आहे.रुग्णालयातील एकूण बेड्सच्या क्षमतेच्या ४० टक्के बेड्सवर उपचार घेणारे रुग्ण सरकारी विमासाठी पात्र ठरतील.उर्वरित २० टक्क्यांवर खासगी शुल्क आकारता येईल.