शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लाचेची ४० लाखांची रोकड पत्रकार परिषदेत

By admin | Updated: July 13, 2017 05:54 IST

हनुमान नगर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप येवले या आरटीआय कार्यकर्त्याने बुधवारी पत्रकार परिषदेत केला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विक्रोळी पार्क साईट येथील सुमारे अडीच हजार झोपड्या असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप येवले या आरटीआय कार्यकर्त्याने बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच हा घोटाळा लपवण्यासाठी तीन विकासकांनी मिळून लाच म्हणून दिलेल्या ४० लाख रुपयांच्या नोटा येवले यांनी टेबलावर मांडल्याने खळबळ उडाली आहे. ‘एसआरए’चे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरही येवले यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत येवले यांनी ओम्कार, रॉक स्पेसेस आणि लेक व्ह्यू या तीन विकासकांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, तिन्ही विकासकांनी मिळून ११ कोटी रुपयांची लाच देऊ केली होती. त्यातील पहिला हफ्ता म्हणून २९ मे २०१७ रोजी ६० लाख रुपये आणून दिले तर दुसरा हफ्ता म्हणून ३१ मे रोजी ४० लाख रुपये दिले. अशा प्रकारे तब्बल एक कोटी रुपयांची लाच आतापर्यंत दिली. त्याचे ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे रेकॉर्डिंग केल्याचे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्यावर आतापर्यंत चार वेळा हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला.या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे ‘म्हाडा’ आणि ‘एसआरए’कडे दिले आहेत. मात्र प्रशासनाकडून प्रकरण मिटवण्याचा सल्ला देण्यात आला. या प्रकरणी येवले यांनी ‘एसआरए’चे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी कारवाई करण्याऐवजी पाटील यांनी प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप येवले यांनी केला आहे. शिवाय विक्रोळी येथील पोलिसांनीही तक्रार मागे घेण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप येवले यांनी केला आहे.>‘ती’ रक्कम मुख्यमंत्री निधीतविकासकांनी लाच स्वरूपात दिलेली १ कोटी रुपयांची रोकड मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करणार असल्याचे येवले यांनी सांगितले.>‘ती’ रक्कम भाड्यापोटी : येवले यांना आम्ही रोख रक्कम पाठवली. पण ती रक्कम ८८ भाडेकरूंच्या भाडेशुल्कासाठी दिली होती, लाच म्हणून नव्हे, असा दावा ओम्कार बिल्डर्सने आपल्या खुलाशात केला आहे. >मी लढणारा पाटील आहे!विश्वास पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. येवले यांच्या आरोपात तथ्य नाही. माझ्या बदनामीचे काम काही जण करीत आहेत. माझ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत दोन दिवसांत सविस्तर प्रतिक्रिया देईन. मी घाबरणारा नाही, तर लढणारा पाटील आहे, अशी प्रतिक्रिया विश्वास पाटील यांनी रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना दिली.