शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

‘त्या’ आवाजाने सजविले ४0 प्रजासत्ताकदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 4:18 AM

लोकांच्या हृदयाला भिडणारी शब्दफेक... आवाजातील भारदस्तपणा... शब्दांना एखाद्या नदीप्रमाणे खळखळत प्रवाहीत करण्याचे कौशल्य... अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या सांगलीतील एका सुंदर आवाजाने एक, दोन नव्हे, तर तब्बल ४0 प्रजासत्ताक दिनांच्या सोहळ्यांना सजविले आहे.

अंजर अथणीकर सांगली : लोकांच्या हृदयाला भिडणारी शब्दफेक... आवाजातील भारदस्तपणा... शब्दांना एखाद्या नदीप्रमाणे खळखळत प्रवाहीत करण्याचे कौशल्य... अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या सांगलीतील एका सुंदर आवाजाने एक, दोन नव्हे, तर तब्बल ४0 प्रजासत्ताक दिनांच्या सोहळ्यांना सजविले आहे. सूत्रसंचालनाची चाळिशी पूर्ण करणाºया श्रीमंत आवाजाचा अत्यंत साधा माणूस म्हणजे विजयदादा कडणे.राष्टÑीय भावनेने इतकी वर्षे अखंडित सेवा देणारे ते एकमेव निवेदक ठरले आहेत. या सोहळ्याची वेळ त्यांनी कधीही चुकवलेली नाही. प्रजासत्ताक दिनावेळी ते ना कधी आजारी पडले, ना कधी त्यांचा आवाज बसला, हे विशेष!‘सांगलीचा आवाज’ म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिध्द आहेत. ‘दादा’ म्हणून ते ओळखले जातात. आज सत्तरीत पोहोचलेले कडणे गेली ४५ वर्षे सूत्रसंचालकाचे काम करत आहेत. दैवज्ञ समाजाचे काम करीत असताना त्यांचा खणखणीत आवाज राजकीय नेत्यांच्या लक्षात आला. त्यानंतर ते सूत्रसंचालन करू लागले. यासाठी त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही किंवा आवाजासाठी कधी पथ्यपाणी पाळले नाही. निमंत्रणाच्या ठिकाणी सायकलवरून ते वेळेआधीच तासभर पोहोचतात.प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन आणि महाराष्टÑदिन हे तीन सोहळे ते अगदी राष्टÑप्रेरणेने करतात. यासाठी कधीही मानधनाची अपेक्षा ठेवत नाहीत. ही सेवा देणे म्हणजे राष्टÑीय कर्तव्य समजतात. ४० वर्षापूर्वी ते एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी त्यांना ऐकले. त्यानंतर गेली ४० वर्षे त्यांना प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी निमंत्रण मिळत आहे.राष्टÑपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम...विजयदादांनी तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, व्ही. पी. सिंग ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या सभांचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक यांच्यापासून सर्वच मुख्यमंत्र्यांच्या सभांसाठीचेही सूत्रसंचालन केले आहे. दिवसामध्ये सहा, सहा कार्यक्रम पार पाडण्याची कसरत त्यांनी केली आहे.विजयदादा गेली ४० वर्षे प्रजासत्ताक दिनाचे सूत्रसंचालन करीत असताना, कार्यक्रमात कधीही अनियमितता झालेली नाही. संबंधित मंत्री, अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडून एक मिनिटही ध्वजारोहणास विलंब झालेला नाही. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे कार्यक्रमही त्यांनी पार पाडले आहेत. कार्यक्रम तीन-तीन तास लांबले आहेत. मात्र सुरुवात वेळेत झाली आहे. राष्टÑशिष्टाचाराचा भंग कधीही झालेला नाही. मात्र शासकीय सोहळे पार पाडताना दादा थोडेसे तणावात असतात.

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८