शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईच्या लढ्यासाठी ४० वकिलांची फौज !

By admin | Updated: July 5, 2015 02:02 IST

म्हादई पाणीतंटाप्रश्नी गोव्याच्या बिनतोड युक्तिवादांमुळे लवादासमोर बाजू लंगडी पडू लागल्याने कर्नाटक सरकार व सर्वपक्षीय राजकारणी आक्रमक बनले असून, कर्नाटकने तब्बल ४० वकिलांची

सद््गुरू पाटील,  पणजीम्हादई पाणीतंटाप्रश्नी गोव्याच्या बिनतोड युक्तिवादांमुळे लवादासमोर बाजू लंगडी पडू लागल्याने कर्नाटक सरकार व सर्वपक्षीय राजकारणी आक्रमक बनले असून, कर्नाटकने तब्बल ४० वकिलांची फौज कामाला लावली आहे. कर्नाटकने म्हादई पाणीतंटा लवादास नवे युक्तिवाद सादर केले असून, त्याचा प्रतिकार करण्यासाठी गोव्याची यंत्रणा सज्ज होऊ लागली आहे. १५ जुलैला लवादासमोर सुनावणी होणार आहे. गोव्यापेक्षा आपलाच म्हादई नदीच्या पाण्यावर जास्त हक्क आहे, असे कर्नाटक सरकार लवादास पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. गोव्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांना त्याची कल्पना आहे. गोवा सरकारची कायदा यंत्रणा तसेच जलस्रोत खात्याची यंत्रणा कर्नाटकला बिनतोड उत्तर देणार आहे. गोव्याकडे एक ज्येष्ठ वकिलासह नऊ वकिलांचे पथक आहे. विर्डी धरणाप्रश्नी गोवा सरकारने महाराष्ट्राविरुद्ध यापूर्वीच खटला जिंकला आहे. महाराष्ट्राने धरणाचे बांधकाम जवळजवळ पूर्ण केले होते. धरणाचा मध्यवर्ती भाग उभारणे बाकी होते. मात्र महाराष्ट्राने आता हे काम थांबविले आहे. गोव्याने विरोध केला नसता तर महाराष्ट्राने एव्हाना पाणी वळविले सुद्धा असते. गोवा सरकारने पर्यावरणवादी डॉ. डी. डी. बसू व जलतज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरविले आहे. बसू यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी केंद्र सरकारसाठी म्हादई नदीचा अभ्यास केला आहे. कर्नाटकने पश्चिम घाट क्षेत्राचा कसा विनाश केला, याचाही त्यांनी अभ्यास केला आहे.