शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागाला रोज ४ लाख लिटर पाणी

By admin | Updated: May 19, 2016 01:58 IST

तालुक्यातील जिरायतीभागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.

बारामती : तालुक्यातील जिरायतीभागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. या भागातील पाण्याचे स्रोत पूर्णत: संपल्याने पाण्याचे नियोजन करणे प्रशासनासाठी अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती नगरपरिषदेच्या वतीने जिरायती भागातील जवळपास ४० गावांना दररोज १० हजार लिटर याप्रमाणे प्रतिदिन ४ लाख लिटर पाणी पुरविण्यास ५ मे पासून सुरुवात करण्यात आली आहे. बारामती शहरातील नागरिकांच्या पाण्याची गरज भागवून पिण्यासाठीचे शुद्ध पाणी जिरायती भागाला पुरविले जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याबाबत पत्र दिले होते. जिरायतभागात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी नगर परिषदेने लक्ष देण्याची सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. जिरायत भागातील पाण्याची भयंकर स्थिती लक्षात घेऊन जगताप यांनी शहरात होणारा पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन याबाबत मुख्याधिकारी नीलेश देशमुख व संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा केली. त्यानुसार शहराची पाण्याची गरज भागवून जवळपास प्रतिदिन ४ लाख लिटर पाणी देणो शक्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिरायतभागाला दररोज ४ लाख लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातून जवळपास १० गावांना दररोज १० हजार लिटर पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. बारामती शहरात ४० दिवस पाणी पुरेल इतके पाणी साठविण्यासाठी दोन तलाव उपलब्ध झाले आहेत. सद्य:स्थितीत हे तलाव भरलेले आहेत. येणाऱ्या १ जूनला धरणातून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुटणार असल्याने उपलब्ध पाण्यात शहराची गरज भागवून जिरायत भागाला पाणीपुरवठा करणे शक्य झालेले आहे. जिरायतभागाला शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागल्याने येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.दरम्यान, बारामती नगर परिषदेच्या वतीने अवचट इस्टेट येथील वॉटर स्टँड पोस्ट येथून पाण्याचे टँकर पाठविले जातात. या ठिकाणी आज नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्यासह सभापती करण खलाटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पाणीपुरवठा सभापती शैलेश बगाडे, उपसभापती दत्तात्रय लोंढे, सतीश तावरे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र खराडे, संभाजी माने, महादेव सूर्यवंशी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख विजय सूर्यवंशी यांनी भेट दिली. (वार्ताहर)नियोजनामुळे बारामती शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन साठवण तलाव उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार नगर परिषदेच्या प्रशासनाच्या सहकार्याने जिरायतभागाला दररोज ४ लाख लिटर पाणी पुरविले जात असल्याचे नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितले. जिरायतभागाला पाणीपुरवठा करताना शहरात कोणतीही पाणीकपात केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.