ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. २७ : नागपुरकडून चंद्रपुरकड़े मालवाहुने जाणारी देशी दारू गुप्त माहितीच्या आधारावर पाठलाग करुन रात्री 7 वाजता आरंभा टोल नाक्याजवळ पकडली. वाहनात 4 लाख 70 हजार रुपये किमतीची देशी दारू आढळली. बादल ठाकुर वय 20, वैभव राठोड़ शैलेश राठोड दोघेही रा. नागपुर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.उपविभागीय अधिकारी वासुदेव सूर्यवशी, समुद्र्पुरचे ठाणेदार रंजितसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चेतन मराठे, अजय अवचट उमेश हरनखेड़े, राहुल गिरडे, चेतन पिसे, राधेशाम धुगे यांनी ही करवाई केली.
चंद्रपूरकडे जाणारी 4 लाख 70 हजारांची दारू जप्त
By admin | Updated: July 27, 2016 20:30 IST