शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

४ किलो सोन्याची तस्करी पकडली

By admin | Updated: March 14, 2015 05:45 IST

जेट एअरवेजच्या विमानातून मुंबई विमानतळावर आलेले ९५ लाखांचे सोने आणि ११ लाखांचे हिरे कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनिटने (एआययू) हस्तगत केले.

मुंबई : जेट एअरवेजच्या विमानातून मुंबई विमानतळावर आलेले ९५ लाखांचे सोने आणि ११ लाखांचे हिरे कस्टमच्या एअर इंटेलीजन्स युनिटने (एआययू) हस्तगत केले. अटेंडन्ट अब्दुल हाफीज खत्री याने हे सोने विमानात दडविले होते. पुढे तो हे सोने सुरक्षितपणे विमानतळाबाहेर काढणार होता. एआययूने खत्री आणि विमानतळावर हे सोने न्यायला आलेल्या महोम्मद अफझल कुरेशी अशा दोघांना अटक केली आहे.दुबईहून मुंबईला निघालेल्या जेट एअरवेजच्या ९डब्ल्यू-५४३ विमानातून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होणार आहे, अशी गुप्त माहिती एआययू अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार हे विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच एआययू अधिकाऱ्यांनी विमान आणि विमानातील कामगारांची झडती घेतली. तेव्हा खत्रीकडून ४ किलो सोने आणि १४५ कॅरेटचे हिरे हस्तगत करण्यात आले. चौकशीत त्याने हे सोने विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने आपल्याकडे दिले होते. तसेच मुंबई विमानतळाबाहेर ठाण मांडून बसलेल्या कुरेशीच्या ताब्यात देण्यास सांगितले होते, अशी माहिती एआययू अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार कुरेशीलाही अटक करण्यात आली. ज्या प्रवाशाने हे सोने खत्रीकडे दिले त्याचा शोध एआययूकडून सुरू आहे. दोघांनी याआधीही अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याची कबुली दिल्याचे एआययूचे अपर आयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तसेच केनियाहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या सागर दवे आणि रसिकलाल या दोन भारतीय प्रवाशांकडून एआययूने तब्बल ३ किलो सोने हस्तगत केले. या सोन्याची किंमत ७४ लाख रुपये आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचे एआययूने सांगितले.