शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

४ मुले बुडाली

By admin | Updated: June 11, 2017 00:58 IST

चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. प्रत्येकी दोन सख्खे भाऊ यात बुडाल्याने

- लोकमत न्यूज नेटवर्क

पंढरपूर (जि. सोलापूर) : चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. प्रत्येकी दोन सख्खे भाऊ यात बुडाल्याने दोन परिवारावर मोठा आघात झाला.गणेश सिध्दाप्पा जुमाळे (वय ६), धीरज सिध्दाप्पा जुमाळे (वय ८, दोघे रा. कासार घाट, पंढरपूर), श्रीपाद सुनील शहापूरकर (वय ८) व सौरभ सुनील शहापूरकर (वय ६, रा. भांडे गल्ली, पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.हे चार जणि आणि केदार सिध्दाप्पा जुमाळ असे पाचजण चंद्रभागा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. केदार हा नदी पात्रात न उतरता वाळवंटातच थांबला होता. चौघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. केदारने घरी जाऊन पालकांना सांगितल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बालकांना बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र ही मुले उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.नदीपात्रातील वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मुलांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. गोव्यात खंदकात दोघे बुडाले वास्को (गोवा) : झरींत-झुआरीनगर येथील औद्योगिक वसाहतीत एका खंदकातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. रोहित पांडे ( ८) व समीर मलबरी ( १२) अशी मृतांची नावे आहेत. औद्योगिक वसाहतीत सुमारे दहा फू ट खोल खंदक खणून ठेवला होता़ दोन दिवस पडलेल्या पावसाचे पाणी त्यात भरले होते. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झरींत भागातील काही मुले या खंदकात उतरली. पाणी गढूळ असल्यामुळे खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले.