शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ३९८ कोटी

By admin | Updated: February 5, 2016 02:57 IST

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने, राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या पाच किनारी जिल्ह्यांत ३९८ कोटींचा ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे

जयंत धुळप, अलिबागजागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने, राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या पाच किनारी जिल्ह्यांत ३९८ कोटींचा ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिल्यावर तत्काळ यंत्रणा कामाला लागली आहे. रायगड जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित चक्रीवादळ निवारा केंद्र, समुद्र उधाण प्रतिबंधक खार बांधबंदिस्ती आणि अलिबाग शहरातील भूमिगत वीज वाहिनींच्या अंतिम मंजुरीपूर्वी पाहणीसाठी जागतिक बँकेचे शिष्टमंडळ रविवार, ७ फेब्रुवारीला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने किनारी भागातील पाच जिल्ह्यात होणाऱ्या या प्रकल्पात, राज्य शासनाचा २५ टक्के तर केंद्र शासनाचा ७५ टक्के हिस्सा राहील. राज्याच्या हिश्शाचे ८४ कोटी येत्या पाच वर्षांत उपलब्ध करून होणार आहेत. प्रकल्पातील भाग ‘अ’ आणि ‘ड’ साठी केंदाकडून १०० टक्के म्हणजे ५८ कोटी ९५ लाख रु पये प्राप्त होणार आहेत. तर भाग ‘ब’ साठी केंद्राकडून ७५ टक्के म्हणजे २५५ कोटी प्राप्त होणार आहे.भरतीचे पाणी भातशेतीत जावून शेती नापीक होऊ नये याकरिता खारलॅन्ड विभागाच्या माध्यमातून समुद्र भरती संरक्षक बांधबंदिस्तीचे काम करण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांपासून शासकीय निधी न मिळाल्याने तसेच अन्य कारणास्तव या खारबांधबंदिस्तीची कामे झाली नाहीत. परिणामी जिल्ह्यातील शेकडो एकर शेती नापीक झाली. आता राष्ट्रीय चक्र ीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत या खारबांध बंदिस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले तर अलिबागमधील फणसापूर, काचळी व पिटकरी या चार गावांची पाहणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात खारबांधबंदिस्तीसाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. दरम्यान, जागतिक बँकेच्या राज्यस्तरीय तज्ज्ञ शिष्टमंडळाने गेल्या महिन्यातच या सर्व प्रस्तावित कामांची पाहणी करुन आपला अहवाल सादर केला आहे.