शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन सदनिका देण्याच्या नावाखाली तीन लाख ९५ हजारांची फसवणूक

By admin | Updated: July 2, 2017 22:22 IST

व्हीआरपी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी मेधा गवारे आणि विक्रम सपाटे यांनी वर्तकनगर येथील असलम मसलत यांची तीन लाख 95 हजारांची फसवणूक केली

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 2 - नवीन घर देण्याच्या नावाखाली व्हीआरपी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी मेधा गवारे आणि विक्रम सपाटे यांनी वर्तकनगर येथील असलम मसलत यांची तीन लाख 95 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गवारे यांना ठाणे महापालिकेने जुन्या रहिवाशांच्या केवळ बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्यांना कोणतेही आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार दिलेले नसताना त्यांनी वर्तकनगरच्या भीमनगर भागात राहणाऱ्या असलम यांच्या घराचे सर्वेक्षण करतेवेळी ठाणे महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनेतून त्यांना त्यांच्या कच्च्या घराऐवजी नवीन पक्के घर मिळवून देऊ, अशी बतावणी केली. त्यासाठी त्यांच्याकडून 2008 ते 2010 या कालावधीत तीन लाख 95 हजारांची रक्कमही घेतली. त्यानंतर त्यांना ठाणे महापालिकेचा लोगो असलेली आणि त्यावर ठाणे महापालिका गृह सर्वेक्षण प्रश्नावली असा मजकूर असलेली बनावट पावती देऊन त्यांचा विश्वास मिळविला. परंतु 1 जुलै 2017 पर्यंत पैसे किंवा नवीन सदनिकाही मिळवून दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर असलम यांनी याप्रकरणी गवारे आणि विक्रम सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.गाळा देण्याच्या नावाखाली 50 लाखांची फसवणूकगाळा घेऊन देण्याच्या नावाखाली कळव्यातील पोपट चौधरी यांच्याकडून सतिश रिचार्ला यांच्यासह तिघांनी 50 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळव्याच्या जुना मुंबई हायवे रोडवरील दत्तवाडीतील साईराम सोसायटीतील रहिवाशी चौधरी यांनी सतिश रिचार्ला यांच्या मध्यस्थीने गाळा मालक शर्मिला कपोते आणि त्यांचा भाऊ हिरोज कपोते यांना त्यांचा गाळा खरेदीसाठी 30 लाख रोख आणि आरटीजीएस मार्फत 20 लाख असे 50 लाख रुपये दिले. जैनम आर्केडच्या तळमजल्यावर शॉप क्रमांक चार मध्ये झालेल्या गाळा खरेदीच या व्यवहारानंतर चौधरी यांना सतिश आणि कपोते बंधू भगिनीने गाळाही नावावर केला नाही आणि पैसेही परत केले नाही. अखेर याप्रकरणी त्यांनी 1 जुलै रोजी कळवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक तुकाराम पोवळे हे अधिक तपास करीत आहेत.