शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराचे वर्षाला ३९ बळी

By admin | Updated: August 17, 2016 03:27 IST

देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिकेपैकी एक असलेल्या मुंबई महापालिका आता महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक बनत असल्याचे माहिती अधिकार कायद्यान्वये

मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिकेपैकी एक असलेल्या मुंबई महापालिका आता महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक बनत असल्याचे माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे. याठिकाणी काम करणाऱ्या महिलांना लैगिक छळाला सामोरे जावे लागत असून दरवर्षी सरासरी ३९ तक्रारी दाखल होत आहेत. गेल्या साडेतीन वर्षात याबाबत तब्बल ११८ तक्रार अर्ज दाखल झाल्याची कबुली पालिकेने दिली आहे. याबाबत ९६ तक्रारीची निर्गत करण्यात आली असलीतरी त्याबाबत संबंधितावर केलेली नेमकी कारवाई प्रशासनाने गुलदस्त्यात ठेवली आहे. गोपनीय बाब असल्याचे सांगून त्याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे. पालिकेच्या महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती आणि सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्राकडे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी त्याबाबत माहिती विचारली होती. त्यावर केंद्राच्या जन माहिती अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी रेखा काळे यांनी कळविले की, जानेवारी २०१३ ते जुलै २०१६ या कालावधीत एकुण ११८ तक्रार अर्ज आले होते. यावर्षात जुलैअखेरपर्यत २१ तक्रारी असून त्यातील ४ प्रकरणे प्रलंबित आहे. गेल्या साडेतीन वर्षात एकुण ९६ प्रकरणे निर्गत करण्यात आली आहेत. त्यामध्ये चौकशीअंती झालेल्या निर्णयाचे पालन तो दोषी कर्मचारी ज्या आस्थापनेवर कार्यरत आहे त्या विभागाकडून करण्यात येते असल्याचे सांगत त्याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.गलगली यांनी पालिका आयुक्तांस पत्र पाठवून मागणी केली की ज्या अधिकारी आणि कर्मचा-यास समितीने लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरविले आहे . त्यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती सार्वजनिक करत पालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करावी, त्यामुळे लोकलज्जास्तव या प्रकाराला आळा बसेल. तसेच समितीचा कार्यकाळ निश्चित केल्यास कोणाचीही लॉबी तयार होणार नाही. (प्रतिनधी)