शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

३८० कुटुंबांचे होणार पुनर्वसन

By admin | Updated: August 15, 2016 00:59 IST

नदीकाठच्या ३८० कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने स्थलांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे

पुणे : मंगळवार पेठेतील जुना बाजाराच्या मागे नदीकाठच्या ३८० कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने स्थलांतर करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कुटुंबीयांना घरे देण्यासाठी महापालिकेच्या वतीने शुक्रवारी, १९ आॅगस्ट रोजी सुनावणीचे आयोजन केले आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची छाननी करून त्यांना हडपसर येथे मालकी हक्काच्या घरांचा ताबा दिला जाणार आहे.जुन्या बाजाराच्या मागील बाजूस नदीकाठी राहत असलेल्या ३८० कुटुंबांना पावसाळ््यामध्ये मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर त्यांच्या घरांमध्ये पाणी जात असे. सर्व सामान घरात सोडून त्यांना महापालिकेतील शाळेचा आसरा घ्यावा लागत असे. या कुटुंबांचे बीएसयूपी योजनेअंतर्गत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव नगरसेवक अजय तायडे यांनी डिसेंबर २०१५ मध्ये प्रशासनासमोर ठेवला. मात्र, अनेक दिवसांपासून या प्रस्तावावर कार्यवाहीच झाली नव्हती. अखेर या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी येत्या शुक्रवारी, १९ आॅगस्ट रोजी सुनावणी घेण्याची जाहिरात महापालिका प्रशासनाकडून प्रकाशित करण्यात आली आहे. संबंधित कुटुंबांना पालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नदीपात्रात अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली असल्याने या कुटुंबांना महापालिकेच्या वतीने ड्रेनेज, पाणी या कोणत्याही मूलभूत सुविधा पुरता येत नव्हत्या. त्यामुळे त्यांना प्रचंड अडचणींचा सामना या कुटुंबांना करावा लागत होता. हडपसर येथे महापालिकेने बांधलेल्या घरांमध्ये या कुटुंबांचे स्थलांतर होणार आहे. जुन्या बाजारात परिसरातील नदीपात्रातील मोठी जागा प्रशासनाला मोकळी मिळणार आहे. कुटुंबांचे स्थलांतर करण्याच्या प्रस्तावास तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी मंजुरी दिली होती. (प्रतिनिधी)>अतिक्रमणास अटकाव : मोकळ््या झालेल्या जागेत संरक्षक भिंतनदीकाठच्या ३८० कुटुंबांचे स्थलांतर झाल्यानंतर मोठी जागा मोकळी होणार आहे. जुना बाजारचा नदीकाठ यामुळे मोकळा घेणार आहे. या ठिकाणी लगेच महापालिकेकडून संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. बीएसयूपी योजनेंतर्गत स्थलांतर करण्याच्या प्रस्तावामध्ये संरक्षक भिंत बांधण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होऊ शकणार नाही.जुन्या बाजारातील आपले मतदारांचे स्थलांतर होईल, या भीतीपोटी काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबांच्या पुनर्वसनामध्ये खोडा घातला जात होता. जुन्या बाजारातच तुम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून घरे देऊ, अशी आश्वासने दिली जात होती. मात्र हा परिसर नदीपात्रातील असल्याने कायद्यातीन तरतुदीनुसार येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे शक्य नव्हते. येथील नागरिकांना याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी स्थलांतरास तयारी दर्शविली आहे. हडपसर येथील महापालिकेच्या इमारतीमध्ये स्थलांतरित होणाऱ्या या कुटुंबांचा राहणीमानाचा दर्जा यामुळे सुधारणार आहे. त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत. झोपडपट्टीमध्ये नदीकाठी त्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहावे लागत होते. त्यापासून त्यांची सुटका होणार आहे.