शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लोहमार्गासाठी ३८० कोटी रुपये देणार

By admin | Updated: April 8, 2017 01:21 IST

पुणे ते लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी तिसरा लोहमार्ग उभारण्यासाठी महापालिकेने ३८० कोटी रुपये द्यावेत

पिंपरी : पुणे ते लोणावळादरम्यान उपनगरीय रेल्वे वाहतुकीसाठी तिसरा लोहमार्ग उभारण्यासाठी महापालिकेने ३८० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे केली. त्यावर याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवून महापालिकेचा हिस्सा दिला जाईल, असे पक्षनेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पुणे-लोणावळा या मार्गावर उपनगरीय रेल्वे सुरू करण्याचा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचा प्रस्ताव आहे. भूसंपादन वगळता या प्रकल्पासाठी दोन हजार ३०६ कोटी खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचा पन्नास टक्के भार केंद्र सरकार व उर्वरित एक हजार १५३ कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. सरकारच्या वतीने पीएमआआरडीए, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका खर्च करणार आहे. पुणे-लोणावळा असा सध्या दुहेरी लोहमार्ग आहे. सध्या या मार्गावरून दररोज ४४ उपनगरीय रेल्वे गाड्यांची वाहतूक होते. तर, दररोज एक लाखाहून अधिक प्रवासी ये-जा करतात. तिसरा आणि चौथा मार्ग अस्तित्वात आल्यानंतर या मार्गावरील गाड्यांची संख्या आणि प्रवासी संख्या आणखी वाढण्यास मदत होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने हिस्सा द्यावा, असा ठराव महासभेसमोर आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने तो मंजूर केला नव्हता. महापालिका निवडणुकीनंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी याबाबत सत्तारूढ पक्षनेत्यांना पत्र दिले आहे. हा विषय सर्वसाधारण सभेसमोर घेण्यात यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली. पत्र मिळताच पक्षनेत्यांनी याबाबत सकारात्मता दर्शविली आहे. पवार म्हणाले, ‘‘आमदारांनी केलेल्या मागणीनुसार लोहमार्ग विस्तारीकरणासाठी आपल्या हिश्श्याची ३८० कोटी रुपयांची रक्कम देण्यास तयार आहे. यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. पुढील सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव मांडून संमत करण्यात येणार आहे.’’(प्रतिनिधी)