शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावातील ३७६ कुटुंबे मृत्यूच्या छायेत

By admin | Updated: June 13, 2016 02:26 IST

गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगरमधील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील तब्बल ३७६ कुटुंबे जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत.

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- महापालिकेसह म्हाडाने केलेल्या दुर्लक्षपणामुळे गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगरमधील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील तब्बल ३७६ कुटुंबे जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे संक्रमण शिबिर असूनही म्हाडाने याकडे दुर्लक्ष केले असून, धोकादायक इमारतींच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.सिद्धार्थनगरमधील म्हाडाच्या संक्रमण शिबिरासंदर्भात म्हाडा प्रशासनासोबत यापूर्वी बैठका झाल्या होत्या, असे प्रभाग क्रमांक ५१ च्या नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी सांगितले. मात्र, कार्यवाही काहीच झालेली नाही. येथील नागरिकांकडे पुरावे असून, त्यांचे स्थलांतरण गोराई आणि मागाठाणे येथे करण्यात येईल, असेही म्हाडाने सांगितले होते. मात्र, या संदर्भातही काहीच कार्यवाही झालेली नाही. शिवाय त्यांचे स्थलांतरण गोरेगावातच करण्यात यावे, अशी मागणीही प्रमिला शिंदे यांनी केली आहे, तर येथे दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा सवाल माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी केला आहे.संक्रमण शिबिरात ३७६ कुटुंबे राहात असून, इमारतीमधील अनेक सदनिका तोडण्यात आल्या आहेत, तर काहींना तडे गेले आहेत. १ ते २४ क्रमांकाच्या इमारतीत अनेक कुटुंबे जीव धोक्यात घालून राहात आहेत. दरम्यान, १९९० साली लालबाग, परळ येथून आम्ही या ठिकाणी आलो. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत आहोत. येथील सदनिका रिकाम्या करण्यासाठी दबाब आणला जात असून, या प्रकरणी आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.