शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३६७ तलाठी बेमुदत संपावर

By admin | Updated: April 27, 2016 03:29 IST

रायगड जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत एकूण ३७० तलाठी व ५७ मंडळ अधिकारी असे सर्व मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत.

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत एकूण ३७० तलाठी व ५७ मंडळ अधिकारी असे सर्व मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. परिणामी जनसामान्यांच्या विविध कामांचा पहिल्या दिवसापासूनच मोठा खोळंबा झाल्याचे सर्वत्र पहायला मिळाले.गेल्या ८ जानेवारी २0१६ पासून, महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याने सर्वसामान्य जनतेशी संबंधित अशा सातबारा उतारे, फेरफार नोंदी, आदि महत्वाच्या दस्तऐवजांकरिता आॅनलाइन प्रणाली सक्तीची करुन, पूर्वीचे हाती नोंदी घालण्याची पद्धत रद्दबातल केली. यामुळे सध्या जनतेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असून, सर्वत्र तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महसुली कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेकांची महत्वाची कामे अडून राहिली असल्याने, पूर्वीप्रमाणे तलाठ्यांनी हाती नोंदी घालणे, सातबारा देणे सुरु ठेवावे तसेच सरकारी संगणकांच्या सर्व्हरची क्षमता वाढवून जनसामान्यांची ही समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी अलिबाग तहसीलदार कार्यालय, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांना देवून त्याच्या प्रती राज्याचे महसूलमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या आहेत.गेल्या सुमारे दोन वर्षापूर्वी या आॅनलाइन प्रणालीचे कामकाज सुरु झाले व एलएमएस प्रणालीद्वारे महसुली नोंदींचा डेटा तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली. त्यातच तलाठी आॅफिसला प्रिंटर नसणे, इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसणे, कित्येकदा लाइट नसणे, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास तांत्रिक सहाय्यक नसणे अशा अनेक अडचणी तेव्हापासून आजही असल्याचे जोग यांनी सांगितले.