शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-भुसावळ तिस-या रेल्वेमार्गावर ३६ लहान पूल

By admin | Updated: July 6, 2016 15:24 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ या दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या रेल्वे (थर्ड) रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत भुसावळ, दि. ६ -  मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ या दरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या रेल्वे (थर्ड) रेल्वे मार्गाच्या उभारणीचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. दरम्यान, या मार्गावर तब्बल ३६ लहान व चार मोठे पूल उभारण्यात आले आहेत.त्यांचे बांधकाम सुरू आहे,अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

दोन टप्प्यात काम भुसावळ-जळगाव हा तिसरा रेल्वे मार्ग एकूण २४.१३ कि.मी.लांबीचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भुसावळ-भादली आणि जळगाव-भादली अशा दोन टप्प्यात या मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.

दरम्यान भुसावळ-भादली मार्ग मार्च २०१८ व जळगाव-भादली मार्ग मार्च २०१९ पर्यंत बांधून पूर्ण होईल.या मार्गावर तब्बल ३६ लहान पूल व चार मोठे पूल आहेत.यात वाघूर नदीवरील पूल,भुसावळातील रेल्वे दगडी पूल,तरसोद व जळगाव येथील पुलांचा समावेश आहे. येत्या आॅक्टोबर पर्यंत या पुलांचे बांधकाम पूर्ण होईल.ही कामे पूर्ण झाल्यानंतर भुसावळ येथील यार्डातील कामांना प्रारंभ होईल.

भू-संपादन प्रक्रियाया मार्गासाठी अत्यंत आवश्यक अशी चार कि.मी.इतकी जमीन भू-संपादनाची प्रक्रिया व्हायची आहे. ही जमीन तरसोद, नशिराबाद आणि आसोदा या तीन गावांच्या शिवारातील आहे. जमीन संपादनासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमीन संपादनाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. जमीन संपादनानंतर रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळेल,असे सूत्रांनी सांगितले.

१०० कोटी उपलब्धदरम्यान, जमीनीवरील कामासाठीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामासाठी रेल्वेकडून १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे,असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.