शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

३६ लोकल स्थानकांचा मेकओव्हर

By admin | Updated: September 3, 2016 01:52 IST

मुंबईतील लोकल रेल्वेस्थानकांचे २ आॅक्टोबरपूर्वीचे त्यांचे रुप अणि नंतरचे रुप यात जमीनअस्मानचे अंतर असेल. २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान त्यांचा अनोखा असा मेकओव्हर केला

मुंबई : मुंबईतील लोकल रेल्वेस्थानकांचे २ आॅक्टोबरपूर्वीचे त्यांचे रुप अणि नंतरचे रुप यात जमीनअस्मानचे अंतर असेल. २ ते ८ आॅक्टोबर दरम्यान त्यांचा अनोखा असा मेकओव्हर केला जाणार आहे. एरवी रुक्ष वाटणारी ही स्थानके रंगीबेरंगी आणि आकर्षक बनतील. ‘हमारा स्टेशन, हमारी शान’ असे या उपक्रमाचे नाव असेल. मुंबई फर्स्ट आणि मेकिंग अ डिफरन्स फाऊंडेशन या संस्थांनी सदर अभिनव उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. त्यात स्वयंसेवक, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी, रिअल इस्टेट कंपन्या आणि उद्योगांचे सहकार्य लाभणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक रेल्वे स्थानक रंगीबेरंगी करण्यात येईल हे करताना त्या-त्या स्थानकाच्या परिसरात असलेली महत्त्वाच्या स्थळांची चित्रे रंगविली जाणार आहेत. वेस्टर्न रेल्वेची चर्चगेट ते दहिसरपर्यंतची चर्चगेटसह २१ स्थानके आणि सेंट्रल लाइनवरील ठाण्यापर्यंतच्या १५ स्थानकांचा समावेश असेल. सीएसटी आणि भायखळा, विद्याविहार, दादर या स्थानकाचा मात्र समावेश नसेल. ‘मुंबई फर्स्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी लोकमतला सांगितले की, ही कल्पना साकारण्यासाठी निधीबाबतदेखील लोकसहभाग घेतला जात असून मदतीचे अनेक हात पुढे आले आहेत. या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी आतापर्यंत ३ हजार ५०० जणांनी नोंदणी केली आहे. स्थानके स्वच्छ करण्यापासून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यापर्यंतच्या प्रत्येक कामात ते सहभागी होतील. एका स्थानकासाठी साडेतीन लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. या सौंदर्यीकरणाचे डिझाईन हे विविध कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आले आणि त्यातून निवड करण्यात आली. केवळ या स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यावरच न थांबता त्यांची देखभाल करणारी यंत्रणाही उभारली जात आहे. (विशेष प्रतिनिधी)