शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार परिसरातून ३६ बोगस डॉक्टर गायब

By admin | Updated: July 21, 2016 03:11 IST

दहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पालिकेच्या आरोग्य विभागाने कोणतीच कारवाई न केल्याने यातील ३६ डॉटरांनी पळ काढला आहे

शशी करपे,

वसई- वसई विरार परिसरातील ५१ बोगस डॉक्टरांची यादी तयार होऊन दहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही पालिकेच्या आरोग्य विभागाने कोणतीच कारवाई न केल्याने यातील ३६ डॉटरांनी पळ काढला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या संशयास्पद कारभारामुळे हे डॉक्टर पळून गेले असून वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार आनंद ठाकूर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.वसई विरार परिसरात बोगस डॉटरांचा सुळसुळाट झाला असून नॅचरोपॅथी, आरएमपी, एनडी, डीईएचएम, डीयूएमएस. डीआयएएसएम, एवीवीएआर, सीएचएमआर, बीएएचएमएस, आयुर्वेदीक, फिजीओथोरेपिस्ट अशा विविध पदव्या धारण केलेले डॉक्टर म्हणून अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत आहेत. नालासोपारा येथील शिर्डीनगरात डॉ. दुबे आणि डॉ.आर. विश्वकर्मा यांनी न्यू लाईफ हेल्थ केअर सेंटर सुरु केले होते. या दोघांची पदवी तर चक्रावून टाकणारी आहे. या बोगस डॉक्टरांनी बोर्डावर बी. कॉम, डीईएचएम, एनडी ही अफलातून पदवी लिहून वैद्यकीय धंदा सुरु केला होता. अशाच पद्धतीने किमान दोनशेहून अधिक बोगस डॉक्टर या परिसरात खुलेआम धंदा करीत आहेत. याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हे करून नोव्हेंबर २०१५ ला ५१ बोगस डॉक्टरांची यादी जाहिर केली होती. धक्कादायक बाब म्हणजे यातील फक्त तीनच डॉक्टरांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुपमा राणे यांच्याकडे विचारणा केली असता ही संशयित डॉक्टरांची यादी असून त्यांच्या कागदपत्रांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असे उत्तर दिले होते. मात्र, दहा महिने उलटून गेले तरी यातील तीन वगळता एकाही डॉक्टरवर महापालिकेकडून कारवाई झाली नाही. दुसरीकडे यादीत नसलेल्या आठ बोगस डॉक्टरांवर थेट कारवाई करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. ।त्यांना पळून जाण्यास संधी दिल्याची तक्रार वसई विरार शहरामध्ये सध्या २१० नोंदणीकृत हॉस्पीटल आणि ७१० नोंदणीकृत दवाखाने आहेत. चार बोगस हॉस्पीटलवर कारवाई करून ती बंद करण्यात आली आहेत. मात्र, वेळेत कारवाई न करण्यात आल्याने यादीतील ३६ बोगस डॉक्टर गायब झाल्याची माहिती उजेडात आली आहे.रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे बंधनकारक असताना पालिकेच्या आरोग्य विभागाने कोणतीच कारवाई न केल्याने त्यांना पळून जाण्यास संधी दिल्याची तक्रार आमदार ठाकूर यांनी केली आहे. गुन्हेगार असलेले डॉक्टर वैद्यकीय अधिकाऱ्याने कारवाई न केल्याने बेपत्ता झाले आहेत. बोगस डॉक्टरांना पळून जाण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुपमा राणे यांनी सहकार्य केले आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांना संरक्षण देणे व कामात कुचराई करणे या दोषारोपाखाली डॉ. राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे.