शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

विभागात ३५२ टँकर सुरू

By admin | Updated: April 30, 2016 01:41 IST

उन्हाच्या वाढत्या झळांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळविले असून, तब्बल सात लाख ५२ हजार ८८५ पेक्षा अधिक जनतेला पाणी टंचाईच्या झळा

पुणे : उन्हाच्या वाढत्या झळांनी लोकांच्या तोंडचे पाणी पळविले असून, तब्बल सात लाख ५२ हजार ८८५ पेक्षा अधिक जनतेला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. उन्हाचा कडाका असाच कायम राहिल्यास टँकरची संख्या ५०० पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यंदा विभागात सरासरी केवळ ७० ते ८० टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. तो आता खरा ठरत असून, एप्रिल महिन्यातच विभागात ३५२ टँकर सुरू असून, ३१२ गावे व तब्बल २ हजार १६३ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मेअखेरपर्यंत टँकरची संख्या ५००च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सन २००३-०४मध्ये देखील विभागात गंभीर पाणीटंचाई होती. तीच परिस्थिती यंदा असल्याची चर्चा आहे. एका जत तालुक्यात सध्या ८० टँकर सुरू आहेत. तर माण, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड तालुक्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. येथे टँकर भरण्याचे पाण्याच्या स्रोतदेखील आटले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत पाणी टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.>विभागात सर्वाधिक १२६ टँकर सांगली जिल्ह्यात सुरू असून, पुणे १०१, सातारा १०३ आणि सोलापूर जिल्ह्यात २२ टँकर सुरू आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ८०, तासगाव १५, कवठेमहांकाळ ९, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ५७, कोरेगाव १०, वाई ४, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात ३४, इंदापूर २१, पुरंदर १६ आणि दौंड तालुक्यात २३ व जुन्नर तालुक्यात ६ टँकर सुरू आहेत.