शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धरणात ३५ टक्के पाणी शिल्लक

By admin | Updated: May 12, 2015 01:47 IST

धो-धो पाणी वापरून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्याची पातळी

कसारा : धो-धो पाणी वापरून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्याची पातळी खालावली असून धरणात फक्त ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जर जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी कमी पाऊस पडला होता. मात्र, तरीही पुरेसा पाणीसाठा मेअखेर शिल्लक होता. तुलनेने गेल्या वर्षी मुबलक पाऊस पडूनदेखील अत्यल्प पाणीसाठा मे अखेर शिल्लक राहिल्याने मुंबईकरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. सर्वाधिक मोठे व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण असलेल्या भातसाची सोमवारी पाणीक्षमता ११२.९९ मीटर म्हणजेच ३५:५६ टक्के एवढी मोजली गेली. गतवर्षी धरण क्षेत्रात २,८०५ मिमी पाऊस पडूनदेखील मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. भातसासह अन्य तानसा, वैतरणा धरणांतील पाणीदेखील कमी होत असून पाण्याची नासाडी करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. (प्रतिनिधी)