शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नगरसेवकांना परमारांकडून ३५ लाख?

By admin | Updated: December 21, 2015 02:13 IST

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार नगरसेवकांपैकी एकाला बिल्डर सुरज परमार यांनी ३५ लाख रुपये दिल्याचे परमार यांच्या डायरीतील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

ठाणे : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार नगरसेवकांपैकी एकाला बिल्डर सुरज परमार यांनी ३५ लाख रुपये दिल्याचे परमार यांच्या डायरीतील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. याच पद्धतीने अन्य तीन नगरसेवकांनाही तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचे वाटप झाले किंवा कसे, याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.आयकर विभागाला सप्टेंबर २०१४ मध्ये सापडलेल्या परमार यांच्या डायरीत सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या व यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका नगरसेवकाला ३५ लाख रुपये दिल्याची नोंद आहे. याखेरीज, अन्य नगरसेवकांनाही मोठ्या रक्कम परमार यांनी दिल्याचे चौकशीत आढळले आहे. मात्र, याकरिता पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे काम सुरू आहे. परमार यांच्या डायरीत काही व्यक्तींच्या अद्याक्षरांचा उल्लेख आहे. मात्र, ही मंडळी बाहेर असून ज्यांचा कुठलाही नामोल्लेख डायरीत केलेला नाही, त्या चार नगरसेवकांना पोलिसांनी विनाकारण तुरुंगात डांबल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. त्याचा प्रतिवाद करताना विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी वरील रकमेच्या व्यवहाराची माहिती न्यायालयाला दिली. सरकारी पक्षाची बाजू ऐकल्यावर न्यायालयानेही त्या नगरसेवकांना जामीन मंजूर केला नाही.परमार आत्महत्या प्रकरणात सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे या चौघा नगरसेवकांना अलीकडेच अटक झाली. सध्या ते ठाणे मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. परमार यांच्या बांधकाम व्यवसायाबाबत वारंवार तक्रारी करून या चौघांनी त्यांचा पिच्छा पुरवला, असे पोलिसांचे मत आहे. या जाचातून सुटका होण्याकरिता परमार यांनी त्यांना मोठ्या रकमा दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्रास असह्ण झाल्यामुळे परमार यांनी ७ आॅक्टोबर रोजी आत्महत्या केली. (प्रतिनिधी)