शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
9
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
10
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
11
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
12
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
13
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
14
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
15
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
16
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
17
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
18
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
19
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
20
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

३५ उमेदवार कोट्यधीश

By admin | Updated: September 29, 2014 01:06 IST

विधानसभा निवडणुकांमध्ये उपराजधानीत अनेक ‘वजनदार’ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नागपुरातील ६ मतदारसंघात अर्ज केलेल्या उमेदवारापैकी ३५ जण (२०.७१ टक्के) कोट्यधीश आहेत.

योगेश पांडे -नागपूरविधानसभा निवडणुकांमध्ये उपराजधानीत अनेक ‘वजनदार’ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नागपुरातील ६ मतदारसंघात अर्ज केलेल्या उमेदवारापैकी ३५ जण (२०.७१ टक्के) कोट्यधीश आहेत. १६९ उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे ही बाब समोर आली आहे. उमेदवार व कुटुंबीयांची संपत्ती मिळून १३७ जणांची संपत्ती १ लाख ते १ कोटी इतकी आहे. केवळ ३२ (१८.९९ टक्के) उमेदवारांची कौटुंबिक संपत्ती १ लाखाहून कमी आहे. ‘लोकमत’ने सर्व उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे शिक्षण, गुन्हे, वय, अपक्ष या मुद्यांच्या आधारे विश्लेषण केले. ३३ टक्के उमेदवार पदवीधरएकीकडे राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून शिक्षणप्रसार तसेच हायटेक सोयीसुविधांबद्दल मोठमोठी आश्वासने देण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्ष दिव्याखाली मात्र अंधारच असल्याचे दिसून येत आहे. अर्ज दाखल केलेल्या १६९ पैकी केवळ ५६ उमेदवार पदवीधर आहे. ९२ उमेदवारांचे शिक्षण तर केवळ बारावीपर्यंतच झाले आहे. ही टक्केवारी चक्क ५४.४४ टक्के इतकी आहे.अर्ध्याहून अधिक उमेदवार ‘तरुण’राजकारणात साधारणत: ४५ च्या खालील उमेदवाराला तरुण म्हणण्यात येते. उपराजधानीतील अनेक पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. सहाही मतदारसंघात १६९ पैकी ८८ उमेदवारांचे वय ४५ किंवा त्याहून कमी आहे. ही टक्केवारी ५२.०७ टक्के इतकी आहे. त्यामुळे यंदाचा प्रचारदेखील युवापिढीला केंद्रस्थानी ठेवूनच करण्यात येईल हे निश्चित.अपक्षांचे ‘बल्ले बल्ले’भाजपा-शिवसेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांत बिघाडी झाल्याने सर्वच मतदारसंघात रंगत वाढली आहे. मोठ्या पक्षांशिवाय स्थानिक पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे ४४.९७ टक्के म्हणजेच ७६ उमेदवार अपक्ष आहेत. यात मोठ्या पक्षांकडून उमेदवारी न मिळालेल्या काही नाराजांचादेखील समावेश आहे.१० टक्के उमेदवारांवर गुन्हेउमेदवारांची छबी पाहून मत देण्याकडे मतदारांचा कल वाढला आहे. नागपुरात अर्ज दाखल केलेल्यांपैकी १८ उमेदवारांवर निरनिराळे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मोठ्या पक्षाच्या नामवंत उमेदवारांची संख्याच यात जास्त आहे. अ़नेक उमेदवारांवरील गु्न्हे हे राजकीय आंदोलनांसंदर्भात आहेत व न्यायालयीन खटले सुरू आहेत.