शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सापडले ३५ बिबटे

By admin | Updated: July 27, 2015 01:16 IST

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅफिकिंग या नवीन पद्धतीने जुलै २०१५ पर्यंत ३५ बिबटे असल्याची माहिती वनअधिकारी क्रिष्णा तिवारी यांनी

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा ट्रॅफिकिंग या नवीन पद्धतीने जुलै २०१५ पर्यंत ३५ बिबटे असल्याची माहिती वनअधिकारी क्रिष्णा तिवारी यांनी दिली आहे. मात्र, यापेक्षाही जास्त बिबटे राष्ट्रीय उद्यानात असण्याची शक्यता तिवारी यांनी वर्तवली आहे. पूर्वी बिबटे किती आहेत, हे शोधण्यासाठी तगमग तंत्रज्ञानाचा वापर केला जात असे. मात्र, या पद्धतीमुळे बिबट्यांची संख्या किती आहे, याचा निश्चित आकडा मिळत नव्हता. मात्र, कॅमेरा ट्रॅफिकिंगमुळे हा निश्चित आकडा मिळण्यास सोयीचे जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले. कॅमेरा ट्रॅफिकिंगमध्ये बिबट्या ज्या वाटेवरून जातो, त्या वाटेचा अंदाज घेऊन रस्त्यातील दोन्ही बाजूंच्या झाडांना हे कॅमेरे लावले जातात. प्रत्येक बिबट्याच्या अंगावरील ठिपके निराळे असतात आणि याच ठिपक्यांवरून बिबटे वेगवेगळे असल्याचे ओळखले जाते. जंगलात वाढणाऱ्या एका बिबट्याचे आयुष्य १४-१७ वर्षे असते. तसेच जिथे सुरक्षित वातावरण व खाण्यापिण्याची उत्तम सोय असेल, त्या ठिकाणी हे बिबटे आपले बस्तान बसवितात. तसेच आरे कॉलनी हा भाग मात्र वन विभागाच्या संरक्षित क्षेत्रात येत नसल्यामुळे येथे असणारे ५ ते ६ बिबटे यांचे संगोपन व्यवस्थित होत नाही आणि ते खाद्याचा शोध घेत रस्त्यावर येतात आणि माणसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढते, असेही तिवारी यांनी सांगितले.