शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या ३४ गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2016 05:38 IST

पुणे महापालिकेभोवतालच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आॅगस्टमध्ये देऊनही राज्य सरकारने त्याबाबत काहीही निर्णय

मुंबई : पुणे महापालिकेभोवतालच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आॅगस्टमध्ये देऊनही राज्य सरकारने त्याबाबत काहीही निर्णय न घेताच पुणे महापालिका व जिल्हा परिषदांना प्रारूप प्रभाग रचना करण्याचा आदेश दिला. ३४ गावांचा प्रश्न टांगणीवरच असल्याने महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर राज्य सरकारला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.भोवतालच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याबाबत राज्य सरकारने २०१४मध्ये प्रारूप अधिसूचना काढली. परंतु, ही अधिसूचना अंतिम नसल्याने ३४ गावांचा प्रश्न तसाच राहिला. याविरोधात श्रीरंग चव्हाण - पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका निकाली काढताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला २०१४ची अधिसूचना अंतिम करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश दिला. उच्च न्यायालयाने दिलेली तीन महिन्यांची मुदत संपत आल्याने व त्यातच महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्यात आल्याने पुण्याचे रहिवासी बाळासाहेब हगवणे यांनी पुणे महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रभागरचना केल्यानंतर राज्य सरकारने संबंधित ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा प्रभाग रचनेची प्रक्रिया पार पाडावी लागेल. हेच जिल्हा परिषदांच्या बाबतीत घडेल. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)