शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

३३५ मुला-मुलींनी काढला घरातून पळ

By admin | Updated: January 17, 2017 02:50 IST

२०१६मध्ये मध्य रेल्वे आरपीएफने अशा एकूण ५७२ मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.

मुंबई : रेल्वे स्थानकांत अनेक अल्पवयीन मुले-मुली रेल्वे पोलिसांना सापडतात. त्याबाबत तक्रार दाखल झालेली असल्याने रेल्वे पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो आणि त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते. २०१६मध्ये मध्य रेल्वे आरपीएफने अशा एकूण ५७२ मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. महत्त्वाची बाब म्हणजे यातील ३३५ मुला-मुलींनी घरातून विविध कारणांस्तव पळ काढला होता, अशी माहिती देण्यात आली. मुंबईचे आकर्षण, अभ्यासासाठी पालकांचा दबाव, अंतर्गत वादविवाद आदी कारणांमुळे अल्पवयीन मुले-मुली घर सोडून मुंबई गाठतात. मुंबई गाठण्यासाठी त्यांच्याकडून ट्रेनने प्रवास करण्यावर भर दिला जातो. मात्र मुंबईत आल्यानंतर आसरा नसल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांतच आपले बस्तान मांडतात. अशा मुला-मुलींचे पालक त्यांचा शोध घेतानाच रेल्वे पोलिसांकडेही तक्रार करतात. तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून त्यांचा यशस्वीरीत्या शोध घेतला जातो. २०१६मध्ये मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एकूण ५७२ मुले-मुली सापडली. यात ३३५ जणांनी घरातून पळ काढला होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर १५ केसेस या अपहरणाच्या, ५९ केसेस या स्थानकात येताच गर्दीत पालकांचा हात सुटल्याच्या आहेत. तसेच १३९ केसेस या बेपत्ता असल्याच्या आहेत. याशिवाय १२ केसेस या तस्करी तर अन्य १२ केसेस या मानवी तस्करीच्या आहेत. (प्रतिनिधी)