शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

३३४ शाळांची मान्यता धोक्यात

By admin | Updated: June 30, 2015 03:08 IST

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी अनुदानित ३३४ प्राथमिक शाळांची मान्यताच धोक्यात आली आहे. शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार नव्याने घ्यावी लागणारी मुदतवाढ

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी अनुदानित ३३४ प्राथमिक शाळांची मान्यताच धोक्यात आली आहे. शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार नव्याने घ्यावी लागणारी मुदतवाढ या शाळांनी घेतलीच नसल्याने संबंधित शाळा अडचणीत सापडल्या आहेत. परिणामी त्याचा फटका शाळेत शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसह शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसणार आहे.मार्च महिन्यात मान्यता संपल्यानंतर संबंधित शाळांना नव्याने मुदतवाढ घेणे बंधनकारक होते. मात्र त्याकडे केलेला कानाडोळा शाळा प्रशासनांच्या चांगलाच अंगलट येणार आहे. परिणामी मुदतवाढ न घेतलेल्या शाळांतील ११ लाख ९ हजार ७०३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई मनपा शिक्षक सभेचे सरचिटणीस रमेश जोशी यांनी यांसदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यात शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार ३०५ शाळांना मान्यतेस मुदतवाढ मिळाली नसल्याचा दावा केला होता. दरम्यान, दाखल झालेल्या एका अतिरिक्त शपथपत्रात पालिकेच्या ३०५ नव्हे, तर तब्बल ३३४ अनुदानित शाळांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षातील मान्यतेसाठी मुदतवाढ घेतली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली.याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र लिहिले होते. त्यात एप्रिलअखेरपर्यंत मुदतवाढ मिळाली नसलेल्या शाळांविषयीची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिका शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केली नव्हती. पालिकेने न्यायालयात परवानगी न घेतलेल्या शाळांची यादी जाहीर केली आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे शेकडो शाळा अडचणीत सापडल्याची माहिती जोशी यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

मुदतवाढ न मिळालेल्या अनुदानित शाऴा...बालमंदिर प्राथमिक मराठी शाळा, गोखले एज्युकेशन सोसायटी, के. एम. शिरोडकर मराठी शाळा, गुरुनानक इंग्रजी प्राथमिक, एसआयडब्लूएस इंग्रजी शाळा, डॉन बॉस्को, बालविकास मंदिर प्राथमिक शाळा, शिवाजी पार्क लॉयन्स, साने गुरुजी विद्यालय, विलेपार्ले महिला संघ, बालविकास विद्या मंदिर, मरोळ प्रागतिक संघ, लॉयन कॉन्व्हेंट स्कूल, कुमुद विद्यामंदिर, अभिनव ज्ञान मंदिर, विद्याभवन प्राथमिक, श्री. एस. के. सोमय्या विद्यालय, केव्हीके घाटकोपर गुजराती, संत ज्ञानेश्वर विद्यालय, शिवाजी विद्यालय, अभिनव विद्यामंदिर, सरस्वती विद्यालय, न्यू हबीब हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, अंजुमन इस्लाम सैफ तय्यबजी अशा मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी माध्यमांच्या ३३४ शाळांचा यात समावेश आहे.