शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३३ पोलीस उपअधीक्षक करणार जात पडताळणी

By admin | Updated: February 10, 2017 02:46 IST

मुंबईसह दहा शहरांतील महापालिका व २५ जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यात मिनी विधानसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई : मुंबईसह दहा शहरांतील महापालिका व २५ जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यात मिनी विधानसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्याचा निपटारा तत्परतेने करण्यासाठी आता राज्यातील ३३ पोलीस उपअधीक्षकांवर समाजकल्याण विभागाच्या अखत्यारितील जात पडताळणीच्या दक्षता पथकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी तातडीने कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बहुतांश अधिकाऱ्यांना सध्या ते ज्या उपविभागात कार्यरत आहेत, त्याच ठिकाणच्या विभागातील जात पडताळणी दक्षता पथकाचा विभाग त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना फारसा लांबचा प्रवास करावा लागणार नसल्याचे गृहविभागातील अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.निवडणुकांमध्ये उमेदवाराला संबंधित प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून निवडणूक लढविताना त्या जातीचा दाखला निवडणूक कार्यालयात देणे अत्यावश्यक असते. मात्र, समाजकल्याण विभागात जात पडताळणी विभागाकडे असलेल्या अपुऱ्या पदामुळे समितीकडील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य सरकारने गेल्या वर्षी या ठिकाणी असलेली १५ उपअधीक्षकांची पदे पुन्हा पुनरुज्जीवित करण्याबरोबरच आणखी २१ पदे नव्याने निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यापैकी ३३ ठिकाणी पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या निवडणुकांमुळे या ठिकाणी उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य छाननी व प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही त्वरित होणे आवश्यक असल्याने, रिक्त असलेल्या ३३ पदांवर विविध पोलीस घटकांमध्ये कार्यरत असलेल्या ३३ अधिकाऱ्यांना त्या ठिकाणच्या जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकात नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार त्वरित स्वीकारा, तसेच संबंधित पोलीस घटकप्रमुखांनी त्यांना या विभागाचे काम पाहाण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा, अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)