शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१५ जागांसाठी ३३ उमेदवार

By admin | Updated: July 18, 2016 04:09 IST

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३१ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी १५ जागा करिता ३३ उमेदवार रिंगणात

पालघर : पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३१ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी १५ जागा करिता ३३ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी पॅनल विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. शनिवारी आघाडी पॅनलच्या उमेदवारांनी टेंभोड्याच्या पद्मनाभ मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली.पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १७ जागांसाठी ३१ जुलै रोजी निवडणूक होत असल्या तरी त्यातील ग्रामपंचायत गटातील इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमाती या अंतर्गतचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन विकास आघाडी पुरस्कृत पालघर कृषी विकास सहकार पॅनल बनविले असून या पॅनलविरोधात शिवसेनेचे पॅनल रिंगणात आहे तर भाजपाकडून दोन जागावर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. या निवडणुकीत सहकारी संस्थांच्या ११ जागासाठी २४ उमेदवार ग्रामपंचायत अंतर्गत सर्वसाधारण दोन जागांसाठी चार उमेदवार व्यापरी गटातून दोन जागांसाठी पाच उमेदवार असे ३३ उमेदवार रिंगणात आहेत. सरकारी संस्थामध्ये सर्वसाधारण सात जागासाठी पंधरा उमेदवार तर अनुसूिचत जाती जमातीच्या एका जागेसाठी तीन उमेदवारांचा समावेश आहे. सहकारी संस्था (सर्वसाधारण) गटातून दोन्ही पॅनलने प्रत्येकी सातही जागावर आपले उमेदवार उभे केले असून एक अपक्ष उमेदवार उभा राहिलेला आहे. शनिवारी कृषी विकास सहकारी पॅनलचे उमेदवारासह आ. विलास तरे बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, जि.प. सदस्य दामोदर पाटील, महिलाध्यक्ष नीलम राऊत, नगरसेवक मकरंद पाटील, वीरेन पाटील, अशोक अंबुरे, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, सिकंदर शेख, वासुलाल पाटील, चंद्रकांत पाटील, दिनकर नाईक, नागेश पाटील, इ.नी टेंभोड्यामध्ये प्रचाराचा नारळ फोडला. (प्रतिनिधी)>अपक्षही रिंगणातमहिला राखीव व इतर मागासवर्गीय जागांसाठी सरळ लढत होत असून अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी मात्र दोन्ही पॅनलने एक उमेदवार उभा केला असून एक अपक्षही रिंगणात आहे. तर ग्रामपंचायत गटातही विकास आघाडी पॅनल विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत होणार आहे.