शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

३,२२८ शेतकऱ्यांची महाराष्ट्रात आत्महत्या

By admin | Updated: March 5, 2016 02:55 IST

मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे

नवी दिल्ली : मागील २०१५ या वर्षात महाराष्ट्रात किमान ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हा उच्चांक आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले.शेतीला व्यवहार्य बनविणे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे विविध योजना राबवीत आहेत, असे ते म्हणाले. ‘महाराष्ट्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या वर्षभरात ३,२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि २००१ पासूनचा आत्महत्यांचा हा उच्चांक आहे,’ असे सिंह यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.महाराष्ट्रातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी यावर्षी महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून ३०४९.३६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवीत आहे, असेही कृषिमंत्री सिंह यांनी सांगितले.१२ लाख हेक्टर शेतजमिनीचा वापरच नाहीदेशात १२ लाख हेक्टर शेतजमीन कुठल्याही वापराशिवाय पडली असून विविध राज्यांमध्ये पट्टे देण्यासंदर्भात असलेले स्वतंत्र कायदे हे यामागील एक मुख्य कारण असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी राज्यसभेत हा खुलासा केला. शेतीयोग्य जमीन कंपन्या आणि उद्योगांना दिली जाण्याची शंका विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली होती. या शंकांचे निरसन करताना या बैठकीचे उद्योगांशी काहीही देणेघेणे नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्राच्या अमरावती विभागात सर्वांत जास्त म्हणजे १,१७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या खालोखाल औरंगाबाद विभागात १,१३०, नाशिक विभागात ४५९, नागपूर विभागात ३६२, पुणे विभागात ९६ आणि कोकण विभागात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.३,२२८ पैकी १,८१९ प्रकरणे अनुदानास पात्रया ३,२२८ आत्महत्या प्रकरणांपैकी १,८४१ प्रकरणे सानुग्रह अनुदानास पात्र ठरली आहेत, तर ९०३ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ४८४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, अशी माहिती सिंह यांनी दिली.