शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

३२ वर्षांच्या लढ्याने माळरानावर फुलली हिरवळ!

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची

- अनिल गवई, खामगाव (बुलडाणा)धरणामुळे एका गावाचे पुनर्वसन करावे लागले आणि कधीकाळी सुखी-संपन्न असलेल्या या गावाला बकाल स्वरूप प्राप्त झाले. मात्र परिस्थितीसमोर हतबल न होता; या ग्रामस्थांनी अनंत अडथळ्यांची शर्यत पार करून, तब्बल ३२ वर्षांनंतर २५० एकर माळरानावर हिरवळ फुलवली. ही यशोगाथा आहे, पिंपरी धनगर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या सामूहिक लढ्याची. १९८७-८८ साली मन प्रकल्पाचे काम सुरू झाले, त्यावेळी पिंपरी धनगर हे गाव या प्रकल्पाच्या पात्रात येत असल्यामुळे गावाचे जलाशयापासून ६०० मीटर अंतरावर पुनर्वसन करण्यात आले. सधन आणि सुखसंपन्न गावाच्या इतिहासाला त्याचवेळी जलसमाधी मिळाली. पुनर्वसित ठिकाणी पाणी नसल्यामुळे शेती पिकत नव्हती. त्यामुळे काहींनी गाव सोडले. वस्तुत: मन प्रकल्पातील सहा टक्के जलसाठा पुनर्वसित गावासाठी आरक्षित असताना केवळ प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे जलाशयाचे पाणी त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे हळूहळू आंदोलन उभे राहीले. या लढ्यामुळे १६ मे तसेच २६ डिसेंबर २०१३ आणि २५ जानेवारी २०१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत विविध प्रशासकीय मान्यतांचे प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे प्रिंपी धनगर येथील ग्रामस्थांना जलाशयातील पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर जानेवारी २०१६च्या पहिल्या आठवड्यात प्रिंपी येथील २७ शेतकऱ्यांना जलाशयाचे पाणी मिळाले. पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांनी कांदा, भुईमूग आणि गव्हाचे उत्पादन घेतले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले असून, अनेकांच्या शेतात कांद्याचे पीक बहरत आहे.गोवऱ्या वेचणाऱ्या हातांना मिळाला रोजगार!शेती पिकत नसल्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी गावातून स्थलांतर केले होते. काहींनी माळरानावरील गोवऱ्या वेचून त्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला; मात्र आता तब्बल २५० एकर जमीन ओलिताखाली आल्याने ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे. वनविभागाकडे एक लाखाचा भरणा!लोकवर्गणीतून पिंप्री धनगरवासीयांनी वन विभागाकडे १ लाख दहा हजार रुपयांचा भरणा केला. वृक्ष लागवडीसाठी आता हे गावकरी धडपडत आहेत. अनेक वर्षांपासून ओस पडलेल्या माळरानावर ३२ वर्षांनंतर हिरवळ फुलली आहे. या आंदोलनाला यश आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे.- आशाताई सुनील जाधव, सरपंच, पिंप्री धनगर, खामगाव