शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३२ हजार शाळा डिजिटल

By admin | Updated: April 25, 2016 07:36 IST

एका शिक्षकाने लोकसहभागातून फळा आणि खडूविना सुरू केलेल्या डिजिटल स्कूल शाळेची संकल्पना ‘डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून’ राज्यभर पसरली आहे.

ठाणे : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने लोकसहभागातून फळा आणि खडूविना सुरू केलेल्या डिजिटल स्कूल शाळेची संकल्पना ‘डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून’ राज्यभर पसरली आहे. राज्यातील ३२ हजार ३४२ शाळांचे डिजिटलायझेशन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ३०९ शाळांचा समावेश आहे.शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा या शाळेतील शिक्षक संदीप गुंड यांनी लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा सुरू करून त्याद्वारे मुलांना शिक्षण देण्याचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यापासून ३० किलोमीटर दूर असलेल्या पष्टेपाडा या आदिवासी दुर्गम भागातील मुले टॅबद्वारे शिक्षण घेत आहेत. या उपक्र माची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये हा उपक्र म राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील ३३ जिल्ह्यांत गुंड यांनी ६७ कार्यशाळांमधून तेथील शिक्षकांना डिजिटल शाळेची संकल्पना काय आहे, ती कशी राबवली जाते, त्याचे महत्त्व काय? हे पटवून दिले. तसेच त्यासाठी कसे वातावरण असावे, कोणकोणती साधने वापरावीत तसेच आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीचा प्रभावीपणे कसा वापर करता येतो, याचे मार्गदर्शन केले. तसेच अ‍ॅण्ड्रॉइड फोनच्या वापराबाबतही प्रोत्साहित केले. छोट्या गोष्टीतून आणि कमी खर्चात ही साधने उपलब्ध होतात. त्यातच, लोकसहभाग कसा उभारायचा, याचेही धडे देण्यात आले. विशेष म्हणजे या घेतलेल्या कार्यशाळेने प्रभावित होऊन अनेक शिक्षकांनी आपली शाळा कशी डिजिटल करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केल्याने राज्यातील तब्बल सहा हजार शाळांचे आजच्या घडीला डिजिटलायझेशन होऊन तेथेदेखील मुलांना शिक्षण मिळू लागले आहे. इंग्रजी शाळेकडे वळलेला विद्यार्थी आज पुन्हा मराठी शाळेकडे येत असल्याचे चित्र अनेक शाळांमध्ये दिसू लागल्याचे गुंड यांनी सांगितले.